एक्स्प्लोर

Amol Mitkari on Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाचा 'तो' पायलट जिवंत आहे का, अपघातामागे सुनियोजित कट? अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Amol Mitkari on Ajit Pawar Plane Crash: लिट्टेने राजीव गांधींची जशी हत्या केली तशीच हत्या अजित पवारांची झाली आहे का?.‌ कॅप्टन सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का?

Amol Mitkari on Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातावेळी आलेला पायलट सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का? 'लिट्टे'ने माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची हत्या केली तशीच अजित पवार (Ajit Pawar) यांची हत्या झालीय का? असा गंभीर सवाल राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपस्थित केला. जर कपूर यांची पत्नी सुमित कपूर (Sumit Kapoor) जिवंत असल्याचे म्हणत असेल तर विमान अपघातात खरंच सुमित कपूरचा मृत्यू झाला का? अशी शंकाही अमोल मिटकरी यांनी बोलून दाखवली. ते अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यातील पारस फाटा येथे 'मुरलीधर राऊत मित्र मंडळा'ने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात बोलत होतेय. अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल मोठं गूढ असताना महाराष्ट्र इतका शांत कसा? असा सवालही त्यांनी केलाय.‌ अजित पवार हे महाराष्ट्राला न मिळालेले शिव विचारांचे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते, असेही मिटकरी यांनी आपल्या भाषणात म्हटले. (Maharashtra Politics news)

अजित पवारांच्या विमानाचे आधीचे पायलट म्हणून जबाबदारी असलेले कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते?. त्याचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत? ते दोघे सध्या कुठे आहेत? असा सवालही त्यांनी केलाय.‌ अजित पवारांचा मृत्यू म्हणजे गोजूबावीच्या माळरानावरचं न उलगडलेलं गूढ असल्याचं ते म्हणालेय. 'ब्लॅक बॉक्स'चा डाटा आणखी काही दिवस देऊ नका. मात्र, सीसीटीव्ही फुटेज का देत नाही? असा सवालही त्यांनी विचारला.

Ajit Pawar Death: अजितदादांच्या शोकप्रस्तावाचे शब्द ऐकताना कानात शिसं ऐकल्यासारखं होईल: मिटकरी

अजितदादांनी मला तीन वेळेस तालिकेवर बसवले. राज्याचे मुख्यमंत्री खाली बसायचे आणि मी वरती खुर्चीवर बसायचो. माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कालावधी 13 मे रोजी संपणार आहे. पण मला वाईट असे वाटते की, दरवर्षी अजितदादा असायचे. आम्ही पहिल्या दिवशी त्यांना गेटवर घ्यायला जायचो. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर बुके देऊन अजितदादांना म्हणायचो की, हे बजेटचे अधिवेशन आहे. आर्थिक पाहणी अहवाल आम्हाला वाचायला मिळावा. तेव्हा दादा सांगायचे की, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ज्यांचे निधन झाले आहे, त्यांचा शोक प्रस्ताव असतो. पण, आता माझ्या जीवनातलं दुर्दैव बघा की, उद्या पहिल्याच दिवशी त्यांच्या नावाचा शोक प्रस्ताव मांडला जात असताना मी त्या सभागृहात असेल. माझ्यासारखा कमनशिबी आणि दुर्दैवी व्यक्ती दुसरी कोणी नसेल. अजित पवार यांच्या बाबतीत शोक प्रस्ताव हा काळीज चिरणारा प्रसंग आहे. शोक प्रस्तावावरचे शब्द कानांत शिसे ओतल्यासारखे असतील, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.

आणखी वाचा

अजित पवार विमान अपघात प्रकरण!  13 निर्धारित मुद्यांवर सध्या चौकशी सुरु, ज्या शंका आहे त्या सोडवल्या जातील : मुख्यमंत्री 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Devendra Fadnavis: टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, कणखरपणे उभा राहिल्याने अमेरिकालाही मागे हटावं लागलं: देवेंद्र फडणवीस
टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, कणखरपणे उभा राहिल्याने अमेरिकालाही मागे हटावं लागलं: देवेंद्र फडणवीस
Harshvardhan Sapkal on PM Narendra Modi: आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
MNS Vardhapan Din 2026 : रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Embed widget