एक्स्प्लोर

Amol Mitkari : अजित पवारांच्या विमानातील क्रू मेंबर पिंकी मालीच्या आईची अमोल मिटकरींनी घेतली भेट; नेमकं कारण काय?

Amol Mitkari Met Pinky Mali Mother : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी हे पिंकी माली यांच्या आईच्या भेटीला गेल्याची माहिती आहे.

Amol Mitkari : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात (Ajit Pawar Plane Crash) मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हा अपघात ही घात असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सातत्याने अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar Death News) विविध शंका उपस्थित करत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनीही याबाबत वेळोवेळी अनेक प्रश्नविचारात आपली भूमिका जाहीर केली आहे. बारामतीत विमान अपघात झाला अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. यात अजित पवारांसह पिंकी माळी, विदीप जाधव,  कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांच्या देखील घराचा आधार गेला. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी हे पिंकी माली यांच्या आईच्या भेटीला गेल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंकी मालीची आई सध्या सुश्रुषा रुग्णालयात भरती असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या वेळी केबिन क्रू असलेल्या पिंकी मालीचा देखील विमान अपघातात मृत्यू झाला होता. अशातच त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी अमोल मिटकरी पिंकी मालीच्या आईंना भेट घेण्यासाठी सुश्रुषा रुग्णालयात दाखल झाले आहे.

Amol Mitkari : VSR वेंचरचे अधिकारी ते सगळे एकूणच अपघाताला जबाबदार, V K सिंग हा कुटुंबाला धमकावतो

पिंकी माळी यांच्या आईला खूप त्रास होत आहे. त्यांच्या पोटचा गोळा गेला आहे, त्या माऊलीची तब्येत बिघडली आहे. V K सिंग हा कुटुंबाला धमकावतो आहे. मस्तीची भाषा करतो आहे. शशिकांत शिंदे यांनी अजित पवार अपघात प्रकरणी चर्चा बाबत स्थगन प्रस्ताव आणला आहे. 3 दिवस चर्चा पुढे गेली. अर्थसंकल्प, राज्यसभा ही कारणे दिली. तो जर स्वतःला मुर्शित पठाण समजत असेल तर त्याने याद राखावे. तोंड खुपसून तिकडे बसला असेल तिकडून त्यांनी बाहेर यावं DGCA, त्यांचे अधिकारी आणि VSR वेंचरचे अधिकारी ते सगळे एकूणच अपघाताला जबाबदार आहेत. असा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.

Amol Mitkari : अजित पवार यांच्याबाबत चर्चा होत नसेल तर दुर्दैव आहे

महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आईच्या आरोग्याच्या संदर्भातला सर्व खर्च उचलावा, याकरता मी सभागृहात निवेदन करणार आहे. आणि हा लढा विमान दुर्घटनेपासून सुरू झालेला आहे, तो बंद पडणार नाही हे तुमच्या माध्यमातून V K सिंगला तो जो कोणी रोहित सिंग आहे मालक त्याला मी आम्ही आज ठणकावून सांगतो. विरोधी पक्षाने स्थगन प्रस्ताव हा मंगळवारी दिला आहे. 93 ची चर्चा त्यांनी फेटाळली होती पण अल्पकाळाची चर्चा परवानगी दिली होती. आज सोमवार आहे आणि सोमवार आज कामकाजामध्येही चर्चा नाही. यामध्ये संदेह निर्माण होत आहे. अजित पवार यांच्याबाबत चर्चा होत नसेल तर दुर्दैव आहे. असेही आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

Ajit Pawar Plane Crash Accident  : अजित पवारांच्या विमानातील क्रू मेंबर पिंकी मालीचाही मृत्यू

पिंकी माळीचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पिंकीच्या आवडीनिवडीनुसार पती सोमकर हा कळवा येथील राहत्या घरी फर्निचरचं काम करीत होता. प्रत्येक सणावारांमध्ये हे जोडपं सोसायटीमधील कार्यक्रमांमध्ये अगदी उत्साहाने सहभाग घ्यायचे. इतकेच नाही तर, हे कपल  सोसायटीमधील सर्वांसोबतच अगदी मिळून मिसळून राहायचे.  रहिवाशांकडून या जोडीचं कौतुक  करण्यात येत होते. दरम्यान, पिंकीच्या निधनानंतर पती सोमकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

अजित पवारांसमवेत विमानातील 5 जण मृत्यूमुखी

  • अजित पवार - उपमुख्यमंत्री
  • विदीप जाधव - अजित पवारांचे सुरक्षा रक्षक
  • पिंकी माळी - क्रू मेंबर
  • कॅप्टन सुमित कपूर - पायलट
  • कॅप्टन शांभवी पाठक - पायलट

 इतर महत्वाच्या बातम्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा
Kolhapur Babasaheb Ambedkar Statue : बाबासाहेब हयात असताना कोल्हापुरात उभरलेला पुतळा Special Report
Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
Summer Heat wave: राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
Embed widget