एक्स्प्लोर

Amit Shah on Local Body Elections: आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुफडासाफ करा, दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत; अमित शाहांची गर्जना

Amit Shah on Local Body Elections: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन पार पडले.

Amit Shah on Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local Body Elections) भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या (Maharashtra BJP) नव्या प्रदेश मुख्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमातून ते बोलत होते. 

अमित शाह म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मृतींना अभिवादन करतो. सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी आज शुभ दिवस आहे. महाराष्ट्र भाजप आपल्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन करून इतिहासात एक नवीन सुरूवात करतोय. पक्षाची स्थापना झाल्यापासून छोटे मोठ्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांना माहिती आहे की कार्यालय हे आपले मंदिर आहे. कार्यालयात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते. बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय हे फक्त काम करण्याचे ऑफिस असेल. भाजपासाठी कार्यालय म्हणजे मंदिरच आहे. 

Amit Shah: भाजप आता स्वत:च्या बळावर उभे

आम्ही नेहमीच सिद्धांताच्या आधारे निती घडवली. भारत व भारतीय लोकांच्या हितासाठी कठोर संघर्ष केला. हे तिन्ही उद्देश ज्या ठिकाणी पूर्ती होते, ते ठिकाण म्हणजे भाजपचे कार्यालय आहे. मी सर्व माजी अध्यक्ष, देवेंद्र फडणवीस व सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. आता भाजप कुठल्या कुबड्यांचा आधार न घेता देखील चालते. भाजप आता स्वत:च्या बळावर उभे आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप हे एक मजबूत स्वाक्षरी म्हणून दिसतेय, असे त्यांनी म्हटले.

Amit Shah: अटलजी बोलले होते की कमळ खिलेगा....

अमित पुढे म्हणाले की, इमारत पाहून मी अभिनंदन करतो. 55 हजार चौरस फुटाचे हे कार्यालय आहे. लायब्ररी, कॉन्फरन्स रूम, प्रदेशाध्यक्षांसोबत इथे मुख्यमंत्र्यांचे देखील कार्यालय आहे. हे कार्यालय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की येथूनच निवडून जायचे आहे. मला आनंद आहे की, महाराष्ट्र भाजपने आपल्या परंपरा लक्षात ठेवल्या आहेत. जनसंघानंतर भाजप निर्माण झाले, तेव्हा अटलजी बोलले होते की कमळ खिलेगा. तेव्हा पहिले पंतप्रधान अटलजी झाले. त्यानंतर 11 वर्षे मोदी जी पंतप्रधान आहेत. देशाचे पंतप्रधान हे भाजपचे नेते झाले ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, असे देखील त्यांनी म्हटले. 

Amit Shah: आमचा पक्ष घराणेशाहीनुसार चालत नाही

ज्या नेत्यांनी कठीण परिस्थितीत पक्ष मजबूत केला, पक्षाच्या विचारांचे बीज लावून त्याचे वटवृक्ष केले, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना मी प्रणाम करतो. मला देखील अध्यक्ष होता आले. भारतात एकमेव भाजप हा पक्ष आहे, जिथे बुथ प्रमुख हा पक्षाचा, देशाचा अध्यक्ष होऊ शकतो. आमचा पक्ष घराणेशाहीनुसार चालत नाही. ज्याच्यात क्षमता आहे तोच या ठिकाणी मोठा नेता होता. आम्ही हे सिद्ध केले की, घराणेशाही या देशात चालणार नाही. तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावाच लागेल, असे देखील अमित शाह म्हणाले. 

Amit Shah: डिसेंबर 2026 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात भाजपचे कार्यालय हवे

अमित शाह पुढे म्हणाले की, एका गरिब चहावाल्याचा मुलगा तीन वेळा पंतप्रधान होतो. लोकशाहीवादी पार्टीत आमचा विश्वास किती दृढ आहे? हे त्याचे उदाहरण आहे. ज्यांच्या पक्षात लोकशाहीवादी पद्धतीने निवड होत नाही, तिथे लोकशाहीचे रक्षण होऊ शकत नाही.  डिसेंबर 2026 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात भाजपचे कार्यालय हवे, अशी विनंती मी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना करतोय. देश सुद्धा 100 टक्के पक्ष कार्यालयाच्या दिशेने घौडदौड करत आहे. 

Amit Shah on Local Body Elections : निवडणुकीत विरोधकांचा सुफडासाफ करा

देवेंद्र फडणवीसांनी 2014 च्या निवडणुकीची आठवण करून दिली. आम्ही युतीचा प्रयत्न केला. निवडणूक स्वतंत्र लढलो. महाराष्ट्राला पहिला भाजपचा मुख्यमंत्री मिळाला. त्यानंतर तीनवेळा आम्हाला बहुमत मिळाले. डबल इंजिन सरकार नको आहे. ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत, अशी गर्जना देखील त्यांनी केली. 

आणखी वाचा 

Sanjay Raut on BJP Maharashtra State Headquarter: मराठी भाषा भवन रखडलं, पण भाजपच्या कार्यालयाची फाईल राफेलच्या वेगाने हलली; संजय राऊत कडाडले, थेट अमित शाहांना पत्र धाडलं!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar Guwahati Tour With Ashok Kharat: अशोक खरातसोबत गुवाहाटीत, फोटो समोर येताच रुपाली चाकणकर म्हणाल्या, गुरुसोबत दर्शन करता आलं तर....
अशोक खरातसोबत गुवाहाटीत, फोटो समोर येताच रुपाली चाकणकर म्हणाल्या, गुरुसोबत दर्शन करता आलं तर....
Maharashtra News LIVE Updates: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Fuel Saving Appeal : पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'च्या आवाहनाला पुण्यात हरताळ! सुनेत्रा पवारांसह अधिकाऱ्यांची बैठक ऑनलाइन, पण अधिकाऱ्यांच्या गाड्यांचे एसी मात्र सुरू
पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'च्या आवाहनाला पुण्यात हरताळ! सुनेत्रा पवारांसह अधिकाऱ्यांची बैठक ऑनलाइन, पण अधिकाऱ्यांच्या गाड्यांचे एसी मात्र सुरू
Sunetra Pawar and Praful Patel NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Sunetra Pawar and Praful Patel NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Embed widget