मुंबई : उद्यापासून कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु होत असून आम्ही देशभरात आंदोलन करू, त्यानंतर जंतर मंतरवर बसू आणि जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके (Abhijit deepke) यांनी केली. ज्ञानेश कुमार गद्दार आहे, त्यामुळे, 2025 ची SIR ची लिस्ट फ्रिज करा, अशी मागणीही दिपकेंनी केली. दरम्यान, मुंबईतील आंदोलनावेळी अटक केल्यास ती चूक ठरेल असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकाही केली. ज्याप्रकारे अमित शाह यांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका, असेही दिपके यांनी म्हटले.
ज्याप्रकारे अमित शाह यांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका. आम्हाला अटक करायची तर आता करा, असे म्हणत अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला. कुठलाही निवडणूक अधिकारी बसेल तो पारदर्शक असला पाहिजे, देशातील 13 करोड मतदार जे डिलिट केले ते सगळे रस्त्यावर उतरवतील, तेव्हा लोक म्हणतील ज्ञानेश कुमारच्या बॉसचा राजीनामा हवा, असे म्हणत अभिजीत दिपकेंनी केंद्र सरकारलाही लक्ष्य केले. जास्तीत जास्त लोकांनी उद्या एकत्र यावे, सन 2005 ची जी वोटर लिस्ट आहे, त्यावरच निवडणुका व्हाव्यात, अशी मागणी अभिजीत दिपकेंनी केली.
आमच्या कोणत्या आंदोलनाला परवानगी दिली होती? लोकशाहीने आम्ही आंदोलन करतोय, सत्तेच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो ते कसे परवानगी देतील? गांधी ब्रिटिशांविरोधात लढा द्यायचे त्यांना सुद्धा असं आंदोलन करायला ब्रिटिशांनी विरोध केला असता, असे म्हणत परवानगी मिळो किंवा नाही, आम्ही आंदोलन करणारच असेही दिपकेंनी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात तीन दिवसानंतर जेलमध्ये गेल्यानंतर बेल मिळते, पण 3 दिवस नाही, तर तीन महिने जेलमध्ये ठेवा... मी रस्त्यावर पुन्हा येईल, पुन्हा येईल पुन्हा येईल.. असे म्हणत दिपकेंनी फडणवीसांना चिमटाही काढला. शिवाजी पार्कवर देवेंद्र फडणवीस रॅली करू शकतात, तर मग शिवाजी पार्कवर आम्ही आंदोलन का करू शकत नाही. तुम्ही मतं शिवाजी पार्कवरुन मागू शकतात मग आम्ही आंदोलन का करू शकत नाही, असा सवालही दिपकेंनी विचारला.
4 तारखेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा
अनेक जण उद्याच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. तर 4 ऑक्टोबरच्या आंदोलनात आमचे लोक सहभागी होणार आहेत, माझा देशभर दौरा आहे, त्यामुळे मी नसेल पण 4 तारखेला आमचे लोक मुंबईत एकत्र येतील. पक्ष म्हणून कोणी एकत्र येणार नाही, आता पक्ष सोडून एकत्र येणार आहोत, असे म्हणत अभिजीत दिपकेंनी मुंबईतील आंदोलनात सीजेपीचाही सहभाग असेल, असे जाहीर केले.
मी शाहरुख खानचा फॅन
मी 30 हजार चे बूट घालतो, कारण मी तेवढं घेऊ शकतो, असे म्हणत अभिजीत दिपकेंनी आपल्या 30 हजार रुपयांच्या बुटाबाबत स्पष्टीकरणही दिले. मी शाहरुख खानचा मोठा फॅन आहे, त्यासाठी रील होती, फॅन मोमेंट होती
हेही वाचा
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
