Amit Shah Post Maharashtra ZP Election Result 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल (Zilla Parishad Election Result 2026) काल जाहीर झाला. या निकालात सत्ताधारी महायुतीनं पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं. सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला. 12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजप, तीन जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना आणि पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली. 

Continues below advertisement

महायुतीच्या या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनी एक्सवर पोस्ट करत महायुतीचं कौतुक केलं आहे. मात्र या पोस्टमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नाव घेतलं नसल्याचे आता विविध चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा परिषद निकालात एनडीएचं अभिनंदन करताना केवळ भाजप आणि शिवसेनेचा अमित शाह यांनी उल्लेख केला आहे.  अमित शाह यांनी अभिनंदन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव घेणे टाळले आहे. 

अमित शाह पोस्टद्वारे नेमकं काय म्हणाले? (Amit Shah Post ZP Election Result 2026)

निवडणूक कोणतीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित NDA वर विश्वास आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीत NDA मिळालेला प्रचंड विजय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. या विजयाबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असं अमित शाह म्हणाले.

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीसांनी अचानक गाठली दिल्ली- (Devendra Fadnavis Delhi Tour)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री अचानक दिल्ली गाठल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची रात्रीतूनच भेट घेतल्याची चर्चा आहे. राज्यातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व आलंय. पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचे वेध लागू लागले आहेत. विलिनीकरणाबाबत राज्यातल्या मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे. राज्यात पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचा गोपनीय दिल्ली दौराही त्याच अनुषंगाने असल्याची माहिती समोर येतेय. मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 12 किंवा 13 डिसेंबरला सुनेत्रा पवारही दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या दौऱ्यात त्या पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची भेट घेणार आहेत. 

जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच क्रमांक एकचा पक्ष- (Zilla Parishad Election Result 2026)

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट दुसऱ्या स्थानी राहिला आहे. यापूर्वी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीतही विक्रमी जागा जिंकत भाजपने यशाचे शिखर गाठले होते. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. जिल्हा परिषदेत 731 जागांपैकी भाजपचे सर्वाधिक 233 सदस्य निवडून आले आहेत. त्याखालोखाल अजित पवार गट 167 आणि शिंदेसेना 162 जागा जिंकल्या आहेत. महायुतीने 731 पैकी तब्बल 562 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस 56, शरद पवार गट 26 आणि उद्धवसेना 43 अशा महाविकास आघाडीने अवघ्या 125 जागा जिंकल्या आहेत. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल