Ambadas Danve छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्यापासुन शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुर ठेवण्यात आल्याचं चित्र आहे. सुनेत्रा पवार शपथ घेणार याबाबतमला माहिती नाही; प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी ठरवलं आहे, आम्ही त्यावर भाष्य करणार नाही, असं शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar On Sunetra Pawar) दरम्यानयाचमुद्दयांवरभाष्यकरतशिवसेनाठाकरेगटाचे नेते अंबादास दानवे यांनीभाष्यकरतटीकाकेलीआहे.

प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे दोन लोक महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे ओळखतात. प्रफुल्ल पटेल यांना तर दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्हीही माहित आहे. हे दोन्ही व्यक्ती स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा इंटरेस्ट, याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या राजकीय स्थितीत जाऊ शकतात, हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे. तटकरे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर पटेल हे नेते आहेत, अतिशय व्यावसायिक पद्धतीने हे राजकारण करणारे लोक आहेत. त्यामुळे यांच्या इंटरेस्टचा माणूसच त्या खुर्चीवर असावा यांचं मत नक्कीच असेल, अशीप्रतिक्रिया अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीदिलीआहे.

Ambadas Danve on  Sunetra Pawar DCM Oath : अजितदादांनी निर्माण केलेलं जागेवर सुनेत्रा वहिनींचा नैतिक अधिकार

दरम्यान, सुनेत्रा वहिनी बद्दल मी तसं बोलणार नाही. मात्र त्यांना अजित दादा यांनी निर्माण केलेलं जागेवर त्यांचा नैतिक अधिकार आहे. शेवटी तो त्याच्याच पक्षाचा निर्णय आहे. ते काय दुसऱ्या पक्षाच्या माणसाला त्यांचा अध्यक्ष करणार नव्हते. शरद पवारांचा आणि त्यांचा पक्ष एकत्र येणार असेल तर ते काय सुप्रियाताई किंवा रोहित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करणार का? त्यामुळे जो निर्णय झालेला आहे तो मानला पाहिजे त्यात खल करण्यात काही अर्थ नाही. असेही अंबादास दानवे म्हणाले.

Ambadas Danve on Sharad Pawar : शरद पवार साहेबांचा हस्तक्षेप असण्याचं कारण नाही

शरद पवारांच्या हाती सूत्र येणारकाअशाआशयाचा चर्चा असू शकतात, मात्र तो पक्ष सरळ सरळ अजित दादांचाच आहे. त्यात पवार साहेबांचा काय हस्तक्षेप असण्याचं कारण नाही. पवार साहेबांना मानणारे लोक असू शकतात, मात्र तो पक्ष अजितदादांचाच आहे. परंतु जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत कुणीकडे जाऊ शकत नाही. कुठल्याही पक्षाच्या अंतर्गत कामकाजात दुसऱ्या कुठल्याही पक्षाने जाऊ नये, असं मला वाटतं. भले तो पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा अजित दादांचा पक्ष असेल. ज्या-ज्या पक्षाचे निर्णय ते ते नेते घेत असतात, प्रत्येक पक्षाच्या सिस्टीम या वेगळ्या आहेत. असेहीअंबादासदानवेम्हणाले.

संबंधित बातमी: