Ambadas Danve on Mahendra Dalvi Video: नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी कॅश बॉम्ब टाकलाय. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात तीन व्हिडिओ आहेत. यामध्ये एका व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) दिसून येत आहे. तर इतर व्हिडिओपैकी एकात नोटांची बंडलं दिसत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर हा मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे, असा दावा महेंद्र दळवी यांनी केलाय. तर हा व्हिडीओ सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या माध्यमातून अंबादास दानवे यांना पाठवल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी केलाय. आता अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले आहे. 

Continues below advertisement

अंबादास दानवे म्हणाले की, माझ्याकडे या लोकांशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने व्हिडिओ पाठवलेला आहे. मला माहिती नव्हतं, त्यात कोण आमदार आहे. तुम्ही नाव सांगितलेले आहे. त्यांच्यासारखा तो मला दिसतोय. समोरचा व्यक्ती कोण आहे याची देखील तपासणी झाली पाहिजे. ⁠धान्याची रास असते तशी नोटांच्या ढिगाची रास आहे. सामान्य माणसाने 50 हजार रुपये देखील बँकेत भरले तरी त्याला बँकेची नोटीस येते. इतक्या नोटांसंदर्भात हे महाशय कोणाशी बोलत आहे? आणि ती व्यक्ती कोण हे देखील समोर येईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाही. कॉन्ट्रॅक्टरचे बिल द्यायला सरकारकडे पैसे नाही. इतक्या नोटांचे ढीग या सत्ताधारी लोकांकडे आहेत हे मी जनतेसमोर आणलेले आहे. आधी देखील संजय शिरसाठ यांचा घरातला व्हिडिओ समोर आला होता. सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी संपत्तीचा हैदोस घातला आहे तो मी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर आणले, असे त्यांनी म्हटले. 

Ambadas Danve on Mahendra Dalvi Video: मॉर्फ केलेला व्हिडिओ असेल तर...

महेंद्र दळवी म्हणाले की, हा मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे. याबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, त्यांनी पोलिसांकडे जावे आणि पोलिसांकडे याची चौकशी करायला सांगावी. पोलीस माझ्याकडे आले तर मी सर्व गोष्टी त्यांना सांगेन. मॉर्फ केलेला व्हिडिओ असेल तर महेंद्र दळवी यांनी पोलिसात तक्रार करावी आणि तपास करावा, असे आव्हान देखील अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवी यांना दिले. 

Continues below advertisement

Ambadas Danve on Mahendra Dalvi Video: मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही

मी व्हिडीओत असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे देखील महेंद्र दळवी यांनी म्हटले. याबाबत विचारle असता अंबादास दानवे म्हणाले की, मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी आरोप करण्यासाठी व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. पन्नास खोके एकदम ओके असे म्हणत असताना काही लोकांना राग येत होता. पण हे खोक्यांचेच राजकारण चालू आहे हे दाखवण्यासाठी मी हे केले. माझं त्यांच्याशी व्यक्तिगत काहीही नाही. मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. मी त्यांच्यावर वैयक्तिक आरोपही केलेले नाहीत, असे त्यांनी म्हटले. 

Ambadas Danve on Mahendra Dalvi Video: महेंद्र दळवींचा व्हिडीओ सुनील तटकरेंनी पाठवला? 

महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ सुनील तटकरे यांच्या माध्यमातून अंबादास दानवेंकडे गेला, असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला. याबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, तटकरेंचं आणि माझं मागच्या एक वर्षात बोलणं झालेलं नाही. मागे एका लग्नकार्यात कुठेतरी भेट झाली असेल. माझ्या मोबाईलवर तटकरे यांचा या वर्षभरात तरी फोन नाही. आता माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. माझ्याकडे व्हिडिओ कुठून आले याचा सोर्स सांगण्याची आवश्यकता नाही. जी गोष्ट आहे तिचा खुलासा करावा. तटकरेंकडून व्हिडिओ आला, राजीनामा देणार, हे आता सोडून द्या. व्हिडीओ तुमचा आहे की नाही इतके सांगा, असे प्रत्युत्तर त्यांनी महेंद्र थोरवे यांना दिले आहे. 

आणखी वाचा 

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा व्हिडीओ, हिवाळी अधिवेशनात वातावरण तापणार