Chhatrapati Sambhajinagar News :छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेत (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) रमाई आवास योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. योजनेत बोगस कागदपत्रे देऊन आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील हा विषय मांडला होता. या योजनेत भाजपच्या नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी आहे. तर नगरसेविकेच्या पतीची वेगवेगळ्या बँकेत 33 खाती असून यात करोडो रुपये असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे.
दरम्यान, घरकुल योजनेचा त्यांनी लाभ (Chhatrapati Sambhajinagar News) घेतला आहे ज्या एजएनसीला काम देण्यात आलंय. एका शैक्षणिक संस्थेला काम दिल आहे. यांनी हाताने लिहून योजनेत नावे घुसवली आहेत. देवगिरी पतसंस्था आणि एक फायनान्स संस्था आहे तिच्या नावावर यांनी बिले काढली आहेत. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावे टॅक्स पावती आणि रेशनिंग कार्ड देखील आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पत्ता असल्याचा गंभीर आरोप देखील आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे.
Ambadas Danve: एकनाथ शिंदे यांच्या नावाने रेशनिंग कार्ड, अन् जातीच प्रमाणपत्र; अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप
संभाजीनगर मधील 1985 रुपये टैक्स थकबाकी आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावाने देखील रेशनिंग कार्ड आहे. यावर एकनाथ शिंदे त्यांची पत्नी, मुलगा श्रीकांत शिंदेआणि त्यांची पत्नी आणि मुलगा यांचं देखील नाव आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावे जातीच प्रमाणपत्र देखील आहे. सोबतच एससी प्रमाणपत्र देखील असल्याचीमाहिती विधान परिषदेत देत अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केलेआहे.
Crime News : धक्कादायक! फोन का उचलला नाही? शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टर आणि महिला डॉक्टरला मारहाण
'माझा फोन का उचलला नाही?' या क्षुल्लक कारणावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या साथीदारांसह डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आपल्या प्रभागातील गरोदर महिलेवर उपचार न करता दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यास सांगितल्याने रमेश म्हात्रे यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना बेदम मारहाण केली. तर एका महिला डॉक्टरला धक्काबुक्की करत अरेरावी आणि दमदाटी केली. रुग्णालयातील हा सर्व थरार तेथील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश