Ambadas Danve on Imtiaz Jaleel: एमआयएमचे इम्तियाज जलील हे भाजपचे हस्तक असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केली. इम्तियाज जलील काळे धंदे करतात, त्यांनीच शहराला व्यसन लावल्याचा आरोपही दानवेंनी केला. दानवेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. 

Continues below advertisement

Ambadas Danve on Imtiaz Jaleel: इम्तियाज जलील भाजपचा हस्तक 

अंबादास दानवे म्हणाले की, इम्तियाज जलील हे भाजपचेच हस्तक असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहराला व्यसन लावले आहे. काळे धंदे करणारा हा व्यक्ती पैशाच्या बळावर आणि सत्ताधाऱ्यांच्या जीवावर निवडून येतो, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे. तर आमची लढत थेट भाजप आणि शिंदे गटाशी आहे. इम्तियाज जलील यांच्याशी आमची कोणतीही राजकीय लढत नाही. उलट शिंदे गटातच एकमेकांविरोधात आव्हाने निर्माण झाली असून त्यांच्यातच संघर्ष सुरू आहे, असे देखील अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. 

Ambadas Danve on Devendra Fadnavis: फडणवीसांचा टॉक शो नव्हे तर फेक शो

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरूनही दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केला.  काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टॉक शो नव्हता तर फेक शो होता. शहराबाबत ते बोललेच नाही. फडणवीसांनी सभा घ्यायला हवी होती. भाजपा या सभेपासून पळून गेली आणि टॉक शो केला. फडणवीसांनी उलट त्यांचीच स्क्रिप्ट बदलावी. भाषणात ते सर्व सारखच बोलतात फक्त शहराचे नावं बदलतात बाकी सर्व सारख असतं. समृद्धीच्या जमिनीबाबत आम्ही अडवलं नसतं तर त्यांनी जमिनी लुटून घेतल्या असत्या शेतकऱ्यांना पाचपट भाव मिळवून दिला. आमचा जमिनी देण्यासाठी विरोध नाही तर दरासाठी विरोध होता. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी आले होते, असं प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहे.

Continues below advertisement

Ambadas Danve on Sambhajinagar Election 2026 : संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेचेच वर्चस्व राहील

संभाजीनगर शहराला 365 दिवसांपैकी किंवा 44 दिवस पाणी मिळाले. शहराला 140 एमएलडी पाणी येतं. मात्र आवश्यकता 240 एमएलडीची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केवळ तारखा दिल्या अजूनही पाणी दिले नाही. लबाडांनो पाणी द्या. हे आंदोलन आम्ही केलं. भाजप अजूनही आश्वासन देते आहे. सध्या ठाकरे गटाकडून जोरदार प्रचार सुरू असून दहा तारखेला उद्धव ठाकरे यांची सभा होईल. त्यानंतर शेवटचा एक टप्पा होईल. संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेचेच वर्चस्व राहील, असा विश्वास देखील अंबादास दानवे यांनी व्यक्त केलाय.

आणखी वाचा 

Raj Thackeray BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकायचा आत्मविश्वास, सांगितलं कारण