Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला आहे. महापालिकेच्या स्वच्छतेच्या कंत्राटावरून उडालेल्या गोंधळावर उत्तर कोणी द्यायचं, यावरून दोन्ही बाजूचे सदस्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. प्रशासनाने उत्तर देण्याऐवजी भाजपचे (BJP) नगरसेवक उत्तर देत असल्याच्या गोष्टीवर विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला. शहरातील स्वच्छतेसाठी पडीक वार्डांचे बजेट वाढवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद निर्माण झालेत.

Continues below advertisement

दुसरीकडे, सत्ताधाऱ्यांसाठी आर्थिक भ्रष्टाचाराचा पूर्ण असल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. या मुद्द्यावर प्रशासनाने उत्तर देण्याऐवजी सत्ताधारी भाजप नगरसेवक विनोद मापारी हे उत्तर देत असल्यामुळे विरोधक आक्रमक झाले. यावेळी काही काळ सभागृहात मोठा गोंधळ उडाला होता.

Akola Municipal Corporation : झोन पुनर्रचनेच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

Continues below advertisement

अकोला महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच मोठा गोंधळ उडाला. झोन पुनर्रचनेच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी रंगली. महापालिकेच्या चार झोनची पुनर्रचना करण्यासाठी भाजपने प्रस्ताव मांडला. तर प्रस्तावावर मतदान सुरू झाले. मात्र यावेळी पहिल्याच सभेत दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद प्रतिवाद झाला. मतदानादरम्यान सदस्यांच्या मोजणीवरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. तर झोन पुनर्रचनेचा ठराव 44 विरुद्ध 29 मतांनी पारित झाला.

अकोला महापालिकेच्या उपमहापौ पदी भाजपाचे अमोल गोगे विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या आजाद खान यांचा 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव केला. उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही एमआयएम तटस्थ राहिली. एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल

एकूण जागा : 80बहुमताचा आकडा : 41

भाजप : 38काँग्रेस : 21उबाठा : 06शिंदे सेना : 01अजित राष्ट्रवादी : 01शरद राष्ट्रवादी : 03वंचित : 05एमआयएम : 03अपक्ष : 02

Akola News : अमेरिकेसोबत भारताच्या व्यापार करारावरून ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार

अमेरिकेसोबत भारताने केलेल्या व्यापार करारावरून आता ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार आहेय. अकोल्यात ठाकरेंची शिवसेना 26 फेब्रुवारीला जिल्ह्यात 36 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार आहेय. यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीये. अमेरिकेसोबत केलेल्या वापर करारामुळे देशभरातील शेतमालाचे भाव पडल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केलाय. हिंदुत्वाच्या गोष्टी करणाऱ्या भाजपला यासंदर्भात हिंदू शेतकऱ्यांच दुःख दिसत नाही का?, असा सवाल त्यांनी केलाय. यासंदर्भात 26 फेब्रुवारीला संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणारेय.