Akola Municipal Corporation 2026 :  अकोल्यात महापौर-उपमहापौर पदाची आज निवडणूक होतेय. महापौरपदासाठी (Mayor) भाजपच्या शारदा खेडकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरेखा काळे यांच्यात लढत होणारेय. तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे आझाद खान आणि भाजपचे अमोल गोगे यांच्यात लढत होणारेय. महापौर पदासाठी भाजपकडून उमेदवारी दाखल केलेल्या कल्पना गोटफोडे माघार घेणारायेत. तर उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल केलेले अमोल मोहोकार आणि अपक्ष आशिष पवित्रकार उमेदवारी अर्ज मागे घेणारायेत. त्यामुळे महापौर, उपमहापौर पदाच्यानिवडणुकीत भाजप सत्ता राखणार? की विरोधक चमत्कार' करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे. (Mayor in Akola) 

Continues below advertisement

Akola Mayor : अकोला शहराला तब्बल चार वर्षांनंतर नवे कारभारी

दरम्यान, भाजपने 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत अकोला सुधार आघाडी नावाने 44 नगरसेवकांचा गट नोंदणीकृत केलाय़े. यामध्ये भाजपचे 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शिंदे सेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि अपक्ष प्रत्येकी एक असे 44 सदस्यांचा यात समावेश आहेय. मात्र, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि भाजपचे बंडखोर अपक्ष आशिष पवित्रकार यांच्या एकत्रित आघाडीने महापालिकेत चमत्कार होण्याचा दावा केलाय. काल रात्रभर दोन्ही आघाड्यांमध्ये बैठकांचे सत्र चालले. भाजपने आपल्या आघाडीतील सर्व नगरसेवक शहराबाहेरच्या सिटी स्पोर्ट क्लब येथे ठेवले. सकाळी 11 वाजतानंतर महापालिकेच्या विशेष सभेत नव्या महापौर-उपमहापौरांची निवड होणारेय. शहराला तब्बल चार वर्षांनंतर नवे कारभारी मिळणारायेत. त्यामुळे अकोल्यात भाजपचा महापौर होत सत्ता कायम राखली जाते काय? किंवा चमत्काराची भाषा बोलत असलेले विरोधक यशस्वी होतात?, याची उत्सकुता लागलीये.

Continues below advertisement

अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल (Akola Municipal Corporation 2026)

एकूण जागा : 80

बहुमताचा आकडा : 41

भाजप : 38

काँग्रेस : 21

उबाठा : 06

शिंदे सेना : 01

अजित राष्ट्रवादी : 01

शरद राष्ट्रवादी : 03

वंचित : 05

एमआयएम : 03

अपक्ष : 02

Akola Mayor Election : महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव

अकोला महापालिकेतील महापौरपद हे यावेळी ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. महापौरपदासाठी भाजपच्या शारदा खेडकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरेखा काळे यांच्यात लढत होणारेय. तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे आझाद खान आणि भाजपचे अमोल गोगे यांच्यात लढत होणारेय. महापौर पदासाठी भाजपकडून उमेदवारी दाखल केलेल्या कल्पना गोटफोडे माघार घेणारायेत. तर उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल केलेले अमोल मोहोकार आणि अपक्ष आशिष पवित्रकार उमेदवारी अर्ज मागे घेणारायेत.

इतरमहत्वाच्याबातम्या