Akhilesh Yadav लखनौ: नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावरून उसळलेल्यातीव्रसंतापाचाआणिविद्यार्थ्यांच्याआग्रहीमागणीनंतरकेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resign)  यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिला आहे. कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) सुद्धा आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. सरकारने त्यांच्या तिन्ही मागण्या मान्य केल्याचे सीजेपीने (CJP) म्हटले आहे. दरम्यान, जंतर मंतरकडे जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना हिंदुत्ववादी नेते सत्यम पंडित मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी त्यांच्या 'एक्स' हँडलवरील एका पोस्टद्वारे भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Continues below advertisement

Akhilesh Yadav: नेमकंकायम्हणाले अखिलेश यादव

दरम्यान, याविषयीअधिक बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, 'भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे गैरवर्तन, शिवीगाळ आणि हिंसाचार सर्वांनी पाहायला हवा. त्यांची हिम्मत बघा! त्यांनी तरुणांना आश्वासने देऊन काही तास उलटलेही नाहीत आणि हे भाजप सदस्य इतिहासाची पुनरावृत्ती करत पुन्हा त्यांचा विश्वासघात करत आहेत. हे सुसंस्कृत भाजप नेते त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या आश्वासनांची उघडपणे पायमल्ली करत आहेत आणि व्हिडिओदेखील बनवत आहेत. हे सुद्धा डबल-इंजिन संघर्षामुळे आहे का? त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे!' अशीमागणी अखिलेश यादव यांनीकेलीआहे.

Continues below advertisement

Sanjay Raut Jitendra Awhad : अखिलेश यादवांच्याभाजपवरटीकेचेआसूड, संजयराऊतसहजितेंद्रआव्हाडहीसंतापले

दुसरीकडे, हाच व्हिडीओ आता खासदार संजय राऊत यांनी एक्स पोस्ट करत दिल्ली पोलिसांना टॅग केलाय. तर जितेंद्र आव्हाडांनी हि हा व्हिडीओ पोस्ट केला असून सत्ताधारी पक्षाचे मग्रूर नेते क्रिमिनल मानसिकता ठेवून हिंसक प्रवृत्ती ने वागताना दिसत आहेत, स्वतःच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या आश्वासनाला वटाण्याच्या अक्षदा लावत आणि त्याचे व्हिडिओही अभिमानाने प्रसारित केले जात आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असून कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

Satyam Pandit : सत्यम पंडित कोण आहे?

सत्यम पंडित हे स्वतःला हिंदू वीर सेनेचे अध्यक्ष म्हणवतात. ऑगस्ट 2024 मध्ये, बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरुद्ध केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे त्याला अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी 2026 मध्ये, मांसाची दुकाने बंद करण्याची मागणी करणाऱ्या मांस विक्रेत्यांवर त्याने हल्ला केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया राजकीयवर्तुळातूनउमटल्याहोत्या.