Akhilesh Yadav on Kiren Rijiju: राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवर भाष्य करतानाभाजपवरअतिशयप्रखरशब्दातटीकाकेली. यावेळी लोकसभेत भाषण करताना राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावरगंभीरआरोपकरतसांगितलंकी, आंदोलकांवर पेलेट गनने गोळीबार करण्याचे आदेश अमित शाह यांनीदिल्याचा दावा केला. या आरोपामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीयावरतीव्रआक्षेपनोंदवत म्हणाले की, राहुल गांधी यांनी सभागृहात माफी मागावी, अन्यथा सभागृहाचे कामकाज असे चालणार नाही. संसदेत अत्यंत चुकीची गोष्ट बोलली जात आहे. ते असे वक्तव्य कोणत्या आधारावर करत आहेत? असेअसेलतरराहुलगांधींनी आदेशाचीप्रतदाखवावीअन्यथामाफीमागावी, अशीआग्रहमागणी किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनीकेली. यावेळ सभागृहातमोठागदारोळआणिघोषणाबाजीझालीअसता यादरम्यान, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी काँग्रेस नेत्याचा बचाव करत विरोधकांचीबाजूलावूनधरली.

Continues below advertisement

Akhilesh Yadav : मुलांवर लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला, हे उघड करणे सरकारची जबाबदारी

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यावेळी म्हणाले की, जर विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले असतील, तर मुलांवर लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला, हे उघड करणे सरकारची जबाबदारी आहे. यावर उत्तर देताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "तुम्ही चौकशीची मागणी करत असाल, तर आम्ही ती मान्य करतो. अखिलेश, तुम्ही जे म्हणत आहात ते वेगळे आहे. राहुल जे म्हणाले ते चुकीचे आहे. राहुल गांधींनी माफी मागावी." अशीउलटमागणी रिजिजू यांनीकेली

Continues below advertisement

Rahul Gandhi on Amit Shah : राहुल गांधीनेमकं काय म्हणाले?

सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026 वरील लोकसभेतील चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमितशाहांवर निशाणा साधत म्हटले की, 'भारताच्या तथाकथित गृहमंत्र्यांमध्ये इथे येऊन बसण्याचे धाडस नाही. मी त्यांचा ताफा पाहिला, त्यात 30 वाहने होती. ते स्पष्टपणे घाबरलेले दिसत होते. गृहमंत्री घाबरले आहेत, म्हणूनच ते आज इथे नाहीत. यावर लोकसभा अध्यक्षांनी त्यांना मध्येच थांबवत म्हटले की, आज गृह मंत्रालयावर चर्चा होत नाहीये, ज्या विषयावर चर्चा होत आहे, त्या विषयाशी संबंधित मंत्री सभागृहात उपस्थित आहेत आणि हाच नियम आहे.

त्यानंतर राहुल गांधी यांनी आरोप केला की, मुलांवर पेलेट्स (गोळ्या) झाडण्यात आल्या आणि त्यांना शॉक देण्याचे आदेश देण्यात आले ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्याआदेशानेआलेत. यावर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्र्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेत म्हटले की, राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याचा आधार स्पष्ट करावा अन्यथा त्यासाठी माफी मागावी. यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.

इतर महत्वाच्या बातम्या