Ajit Pawar on Eknath Shinde Shivsena Upset Ministers : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतीच मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्यांची एक महत्त्वपूर्व बैठक घेतली आहे. या बैठकीत शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यासोबत 'वन टू वन' चर्चा केली.  चर्चेदरम्यान, प्रत्येक खात्याचा आढावा घेत असताना शिंदेंच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतची उघड नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे शिंदेंचे सर्वच्या सर्व नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर नाराज असल्याचं समोर आलंय. 

अर्थमंत्री म्हणून फाईलवर केवळ माझीच सही नसते, तर.... 

दरम्यान, याच मुद्द्यावर आता अजित पवार यांनी स्वत: भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. निधी मिळत नसल्याच्या शिंदेंच्या आमदारांच्या टीकेबाबत अजित पवारांनी स्पष्टोक्ती देताना सांगितलं की, निधी वाटप फाईल वर केवळ अर्थमंत्री अजित पवार यांची सही नसते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील फाईलवर सही असते.आगामी काळात पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. त्यावेळीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने निधी वाटप होईल, असं ही अजित पवार म्हणाले. मंगळवारी रात्री राष्ट्रवादीच्या आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली त्यावेळी अजित पवार बोलत होते.  

अर्थमंत्री आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही काम कसं करणार?

नुकतीच शिंदेंच्या आमदारांची एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली त्या बैठकीत अजित पवार निधी देत नसल्याची तक्रार आमदारानी शिंदेकडे केली होती. अजित पवार आमच्या विकास कामांवर खोडा घालत आहेत, असं म्हणत शिवसेना मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर अजित पवारांबाबतची नाराजी (Shivsena Upset Ministers) व्यक्त केली आहे. अजित पवार अर्थमंत्री आहेत, ते जर आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही काम कसं करणार? अशी चिंता देखील यावेळी शिंदेंच्या सर्व मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळायला हवेत, असं मंत्र्यांनी बोलून दाखवलं आहे. यावर बोलताना अजित पवारांनी आमदारांच्या बैठकीत माहिती दिली.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sushma Andhare: सुषमा अंधारेंनी आता जालिंदर सुपेकरांच्या मेहुण्याचंही नाव घेतलं, PI शशिकांत चव्हाणांकडे थार गाडीतून गेलेल्या चोंधेची केस!

Rupali Chakankar & Rashmika Mandanna: रुपाली चाकणकरांवर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळायला, त्या काय रश्मिका मंदाना आहेत का? सुषमा अंधारेंची खोचक टीका