एक्स्प्लोर

Ajit Pawar Plane Crash Video: अजित पवारांच्या अपघातानंतरचा 'तो' व्हिडीओ समोर, खाली पडलेलं विमान, लोकांची गर्दी, इतक्यात धडामssss आवाज झाला अन्...

Ajit Pawar Plane Crash Video: अजित पवार यांचे विमान 28 जानेवारीला बारामती कोसळले होते. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. रोहित पवार, अमोल मिटकरींना घातपाताचा संशय

Ajit Pawar Plane Crash Video: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. अजित पवार यांच्या या विमान दुर्घटनेबाबत (Plane Crash) अनेकांकडून सध्या घातपाताचा संशय व्यक्त केला जात असतानाच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. बारामती तालुक्यातील गोजुबाबी अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान कोसळले होते. तेथील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांचे विमान खाली कोसळल्यानंतर त्याचा स्फोट झाला आणि त्याचे तुकडे सर्वत्र विखुरले होते. स्फोटाचा आवाज ऐकून गोजुबाबी येथील गावकरी घटनास्थळी येऊन पोहोचले. हे गावकरी जळणाऱ्या विमानाभोवती जमले असतानाच आणखी एक स्फोट झाला. हा स्फोटाचा आवाज ऐकून सगळे गावकरी घाबरले आणि पळत सुटले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Ajit Pawar Latest news)

दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने गावकऱ्यांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. विमान कोसळल्यानंतर काही क्षणांतच त्याला भीषण आग लागली होती. ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या स्फोटाचा थरारक व्हिडिओ आता समोर आला असून जळत असलेल्या विमानातून मोठ्या आवाजात स्फोट होताना स्पष्ट दिसत आहे. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी 28 जानेवारीला सकाळी बारामती येथे येत होते. अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाने सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले होते. हे विमान साधारण 8.45 च्या सुमारास बारामतीच्या आसपास पोहोचले. हे विमान बारामती विमानतळाच्या रनवेवर उतरण्यापूर्वी बाजूच्या शेतात जाऊन कोसळले. खाली कोसळल्यानंतर या विमानाचा स्फोट झाला होता. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. सध्या या विमान दुर्घटनेची संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. या विमानाचा वैमानिक ऐनवेळी बदलण्यात आला होता. या सगळ्यामागे कट असू शकतो, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)



आणखी वाचा

अजितदादांच्या विमान अपघातापूर्वी कॅप्टन शांभवी पाठक 'ओह शीट... ओह शीट' का बोलल्या? रोहित पवारांना कोणावर संशय?

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yogesh Kadam on LGP Gas Shortage: राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा; राज्यमंत्री योगेश कदमांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, पुढील काही दिवसात....
राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा; राज्यमंत्री योगेश कदमांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, पुढील काही दिवसात....
Ambadas Danve : भाजपची 'पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग' की गुन्हेगारांचे अभयदान? अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला रेड कार्पेट; अंबादास दानवेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
भाजपची 'पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग' की गुन्हेगारांचे अभयदान? अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला रेड कार्पेट; अंबादास दानवेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
LPG Gas Shortage: कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सतेज पाटलांचा सरकारवर संताप
कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सतेज पाटलांचा सरकारवर संताप
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Embed widget