Ajit Pawar Accident Plane Crash : दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar accident plane crash) दिवसेंदिवस संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. अजितदादांचा (Ajit Pawar Death News) अपघात की घातपात? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून राज्य सरकारने या अपघाताची सखोल चौकशी करावी आणि सत्य बाहेर आणावे या मागणीसाठी बारामती तालुक्याती डोर्लेवाडी गाव (Dorlewadi Village Bandh) आज बंद ठेवण्यात आले आहे.
अशातच, अजित पवारांचा अपघाताचा तपास व्हावा या मागणीसाठी काल (रविवारी) बारामती तालुक्यातील लोणी भापकर हे गाव बंद ठेवण्यात आले होते. यावेळी लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षकांना पत्र लिहतसखोलचौकशीची मागणीकेलीहोती. असेअसताना अजित पवारांच्या घातपाताचा संशय व्यक्तकरत बारामतीमधील आणखी एका गावामध्ये बंद पुकारण्यातआलाआहे. त्यामुळे अधिवेशनाच्या सुरुवातीलाच वेगळाच पॅटर्न बघायलामिळतआहे. (Dorlewadi Village Bandh)
Baramati NCP : बारामतीतील प्रशासकीय भावना बाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले
अजितदादांच्या निधनाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या बातम्या पाहता आम्हाला अजित पवार (Ajit Pawar) यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवेदन देणार आहोत. अजित पवारांचा विमाना अपघातात मृत्यू झाला त्या घटनेची सखोल चौकशी व्हावी, यासाठी बारामतीतील प्रशासकीय भावना बाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले आहेत. प्रांत अधिकारी यांना दिवेदन देऊन सरकारने याची सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करणार आहेत. कार्यकर्त्यांना अजित पवारांचा झालेला विमान अपघात हा घातपात वाटतो आहे. अशीशंकाया कार्यकर्त्यांनीबोलतानाव्यक्तकेलीआहे.
Ajit Pawar Death Plane Crash: शोकप्रस्तावावर अनेक नेते बोलणार
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत स्व. अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे. पारंपरिक पद्धतीनुसार हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडला जाईल आणि त्यांच्याच हस्ते वाचून दाखवला जाईल. मात्र, यावेळी अनेक सदस्यांनी अजित पवार यांच्या कार्याबाबत सभागृहात मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याने शोकप्रस्तावावर विशेष चर्चा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे गटनेते तसेच प्रत्येक पक्षातील किमान तीन सदस्य हे सभागृहात आपली भावना व्यक्त करणार असल्याची माहिती आहे.
इतरमहत्वाच्याबातम्या
