Ajit Pawar Plane Crash Baramati: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामतीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार (Ajit Pawar Funeral Baramati) करण्यात आले. विमान अपघातात बारामती इथे अजित पवारांचा काल मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण राज्य दुःखात बुडालं. लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. विद्या प्रतिष्ठानमध्ये ज्येष्ठे नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व पक्षांतील ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित होती.
अजित पवार खाजगी विमानाने काल (28 जानेवारी) सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. सकाळी 8.45 च्या दरम्यान ही सगळी घटना घडली. दरम्यान, बारामतीतील विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. विमानातील ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग काढण्यात येणार आहे आहे. विमानातील एफडीआर, सीव्हीआरमधील रेकॉर्डिंग काढण्यात येणार आहे. (Ajit Pawar Plane Crash)
अपघाताआधी पायलट जोरात ओरडला- (Ajit Pawar Pilot Shambhavi Pathak And Sumit Kapoor)
अपघात होण्याच्या काही मिनिटांआधी पायलट जोरात ओरडल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. चुकीच्या ठिकाणी लँडिंग करण्यात येत असल्याचा अंदाज अपघाताच्या काही सेकंदाआधी पायलटला आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच विमानाच्या पायलटकडून एटीसीला मेडे कॉल केला नसल्याची माहितीही समोर आली आहे.
सरकारच्या प्राथमिक अहवालात नेमकं काय? (Ajit Pawar Death Baramati)
सदर विमान 28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आलं. या अहवालानूसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाही आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर इतकी आहे. त्यानंतर विमानातील पायलटने सांगितलं की ते रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत आहेत. पण त्यांना रनवे दिसत नाहीय. नंतर पायलटने पुन्हा एटीसीला सांगितलं की रनवे दिसू लागला की सांगतो. त्यानंतर 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, असं एटीसीवर काम करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
अजित पवारांच्या विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम- (How did Ajit Pawar plane crash?)
- पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
- बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे
- ILS (Instrument Landing System) सुविधा नाहीत.
- पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
- विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
- याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
- धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
- दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
- DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
- लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
- सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला
- रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले
- आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
- विमानात भीषण आग लागली
- आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही
- अपघाताचा तपास चालू आहे; DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.
