Ajit Pawar Plane Crash Baramati Airport: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा 28 जानेवारीला विमान अपघातात (Ajit Pawar Plane Crash Baramati) दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर बारामती विमानतळ (Baramati Airport Pune) चर्चेत आलं. बारामती विमानतळावर टेबलटॅाप रनवे आहे. टेबलटॉप रनवे लँडिंगसाठी अतिशय कठीण असल्याचं मानलं जातं. (Baramati Airport Tabletop Runway)
टेबलटॉप रनवे म्हणजे काय, कशी असते? (Baramati Airport Tabletop Runway)
डोंगर, समुद्र, दरी किंवा जागेअभावी हवाईपट्टी उंच भरावावर बनवलेली असते रनवेच्या दोन्ही बाजूंना खोल उतार असतो. ती वरून सपाट टेबलसारखी दिसते. त्यामुळे टेबलटॉप अशा हवाईपट्ट्या फक्त लद्दाख, तवांगसारख्या ठिकाणी योग्य ठरते. बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे ILS (Instrument Landing System) सुविधा नाहीत.
टेबलटॉप रनवे कधी बरोबर ठरते? (Baramati Airport Tabletop Runway)
- जागा नसलेल्या भागात(लद्दाख कारगिल तवांग)
- लहान–मध्यम विमानांसाठी
- हवामान स्वच्छ असल्यास
- अनुभवी पायलट आणि योग्य उपकरणे (ILS, EMAS) असल्यास...
टेबलटॉप रनवे कुठे चुकीची/धोकादायक ठरते? (Baramati Airport Tabletop Runway)
- पावसात, धुक्यात, वाऱ्यात
- रनवे लहान असेल तर
- थोडीशी चूक- थेट उतारात पडण्याचा धोका
टेबलटॉप रनवेचे मोठे धोके- (Airport Tabletop Runway)
- ब्रेक फेल किंवा लँडिंग उशीर- थेट अपघात, चूक सुधारायला दुसरी संधीच मिळत नाही.
अजित पवारांच्या विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम- (How did Ajit Pawar plane crash?)
- पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
- बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे
- ILS (Instrument Landing System) सुविधा नाहीत.
- पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
- विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
- याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
- धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
- दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
- DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
- लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
- सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला
- रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले
- आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
- विमानात भीषण आग लागली
- आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही
- अपघाताचा तपास चालू आहे; DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.
