एक्स्प्लोर

Ajit Pawar Memorial: अजित पवारांच्या स्मारकावरुन जय पवार-पार्थ पवारांमध्ये मतभिन्नता, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar Memorial: अजित पवार हे 28 जानेवारीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला येत असताना त्यांचे विमान कोसळले होते. यामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला होता.

Ajit Pawar Memorial: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झाले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांचे स्मारक उभारण्याची चर्चा सुरु झाली होती. काही दिवसांपूर्वीच विद्या प्रतिष्ठानमध्ये या विषयाबाबत शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार (Jay Pawar) यांची एक बैठक पार पडली होती. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना आता अजित पवार यांच्या स्मारकाबाबत पार्थ पवार (Parth Pawar) आणि जय पवार या दोघांमध्ये मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांचं स्मारक किंवा संग्रहालय कुठे उभारायचे यावरुन जय पवार आणि पार्थ पवार यांची वेगळी मतं आहेत. (Maharashtra Politics News)

जय पवार यांचा अजित पवार यांचं संग्रहालय पुण्यात करा आणि स्मारक बारामतीत असावं असा आग्रह आहेत. तर पार्थ पवार यांच्याकडून वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे.  पार्थ पवार हे अजित पवारांचे संग्रहालय आणि स्मारक हे दोन्ही एकाच ठिकाणी म्हणजे बारामतीत उभारण्याबाबत ठाम आहेत.

परंतु, अजित पवार यांचे पुणे जिल्हा आणि पुणे शहर यावर प्रचंड प्रेम होते. त्यामुळे अजित पवार यांचे संग्रहालय पुणे शहरात असावे, असे जय पवार यांचे म्हणणे आहे.  मंगळवारी जय पवार यांनी मंत्रालयातील सुनेत्रा पवार यांच्या दालनात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांसमोर भूमिका मांडत आपली इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे आता सुनेत्रा पवार आणि इतर पवार कुटुंबीय याबाबत काय निर्णय घेणार, हे बघावे लागेल.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांची उद्या पुण्यात बैठक

उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री  सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे यात 2026- 27 या आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मान्यता दिली जाणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नियोजन समितीची ही पहिलीच बैठक होणार आहे. जानेवारीत अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा परिषद आणि इतर शासकीय विभागाकडून विकास आराखडे तयार करण्याचे काम सुरू होते

Sunetra Pawar meets PM Modi: सुनेत्रा पवार पंतप्रधान मोदींना भेटणार

उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाल्या आहेत. आज सकाळी 11 वाजता
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपराष्ट्रपतींची  भेट घेणार आहेत.  राज्यसभा खासदार म्हणून त्या आपला राजीनामा उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करतील.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी जात असल्याची माहिती  उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीचा गुप्त दौरा केल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे. दिल्ली दौऱ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल देखील सोबत असणार आहेत.

आणखी वाचा

'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan on Rohit Pawar: रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले
रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Droupadi Murmu : ममता बॅनर्जींना मी माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण...; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांचीही टीका
ममता बॅनर्जींना मी माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण...; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांचीही कठोर शब्दात टीका
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget