Aditi Tatkare On Ajit Pawar:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल ( 28 जानेवारी) विमान अपघातात अकाली निधन झाले. बारामतीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Ajit Pawar Plane Crash) अजितदादांच्या शेवटच्या दर्शनाला अनेक चाहते समर्थक सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. लाखोंचा जनसमुदाय बारामतीत एकवटला होता. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतनामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरात बुडाला आहे. त्यांच्या जवळचे अनेक नेते सुन्न झाले आहेत. अजित दादांना अखेरचा निरोप देत सर्वजण बाहेर पडले. कोणीही प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते. दरम्यान, अजितदादांची लाडकी आमदार आणि लेकीसमान अशी ओळख असणाऱ्या अदिती तटकरे यांना अजितदादांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. त्यांना भावना अनवर झाल्या होत्या.
सभागृह आधी सारखं नसणार आणि आमची आयुष्य ..
अजितदादांची सगळ्यात आवडती आमदार असं विचारलं की अजितदादा आणि अदिती तटकरेंच नाव घ्यायचे. सगळ्यात हुशार आमदार, सर्वात चांगलं काम कोण करतं या सगळ्या प्रश्नांचे उत्तर अदिती तटकरेंभोवती येऊन थांबायचं. यावर अदिती तटकरेंनी प्रतिक्रिया दिली, त्या म्हणाल्या " आम्ही नेता गमावला आमचा . त्यांना परत बघता नाही येणार . याचं दुःख आम्हाला आहे. कधीही न भरून येणार दुःख आहे. 'एकच दादा अजितदादा ' असं म्हणताना त्यांचे डोळे पाणवले होते.
त्यांनी नेहमीच आम्हा सगळ्यांना पाठबळ दिलं . आधार दिला . चांगलं काम केलं तर प्रशंसा करायचे . थोड्या कुठे चुका झाल्या तर हक्काने वडिलांसारखे ओरडायचं .मार्गदर्शन करायचे . एक दिवस असा गेला नाही की दादांचं नाव तोंडातून निघालं नसेल. किंवा त्यांची दिवसभरात आठवण काढली नसेल. ही आठवण कायम मनात राहील. प्रत्येक बाबतीत त्यांची आठवण येत राहील . एका बाजूने दादांनी केलेल्या कामाचं कौतुक होतंय . महाराष्ट्राने काय गमावलं याबाबत याबाबत सगळेजण बोलत आहेत . हे ऐकायला दादा नाहीत.
दादांनी भरभरून प्रेम दिल. माझ्या वडिलांचं जसा मार्गदर्शन मिळत आलं तसं त्यांचंही नेहमी मिळत आलं. प्रोत्साहन देत राहिले. नेहमी तरुणांना महिलांना युवतींना संधी मिळाली पाहिजे. नवनेतृत्व आपल्यात घडलं पाहिजे हीच त्यांचं म्हणणं असायचं.
एखाद्या कार्यकर्त्याला कसं घडवायचं ?त्याला ताकद कशी द्यायची ? त्याला प्रशासकीय ज्ञान कसं द्यायचं ? हे दादांकडून घेण्यासारखा आहे. मला आठवतं मी 2019 मध्ये जेव्हा आमदार झाले, त्यावेळी पहिलं भाषण सभागृहात कसं करायचं हे मी दादांकडून शिकले. अगदी बजेट वरचे मुद्दे कसे मांडायचे , पुरवणी मागण्या, भाग क्रमांक पान क्रमांक बोलून कसं उठायचं, या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. सभागृह हे आधी सारखं नसणार आहे. आणि आमच्या सगळ्यांचा आयुष्यही त्यांच्याविना आधी सारखा नसणार. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे जड अंतःकरणाने म्हणाल्या. बोलताना त्यांचे डोळे पाणवले होते .
