बारामती (पुणे) :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांचं आज सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी झालेल्या विमान अपघातात निधन झालं. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला तेव्हा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीत होते. अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती मिळताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार  विमानानं पुण्यात दाखल आले. तिथून हेलिकॉप्टरनं हे सर्वजण बारामतीत दाखल झाले. बारामतीत दाखल झाल्यानंतर सुप्रिया सुळे या भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. बारामतीत विठ्ठलदादा मणियार यांना पाहताच सुप्रिया सुळे त्यांच्या गळ्यात पडून रडल्या. 

सुप्रिया सुळे विठ्ठलदादा मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार बारामतीत आले त्यावेळी तिथं त्यांचे नातेवाईक राणाजगतिसिंह पाटील तिथं उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे या विठ्ठलदादा मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचा उल्लेख तुमचा एकदम लाडला असा उल्लेख केला. यानंतर त्या मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. यानंतर सुनेत्रा पवार यांना देखील अश्रू थांबवता आले नाहीत. 

अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

अजित पवार यांचं पार्थिव आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ठेवण्यात आलं आहे. अजित पवारांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते नेते बारामतीत दाखल होत आहेत. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे. 

नरेंद्र मोदी- अमित शाह उपस्थित राहणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देखील अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराल उपस्थित राहणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार शरद पवार यांना सांत्वनपर फोन केला असल्याची माहिती आहे. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विमानातून प्रवास करणाऱ्या इतरांचा देखील मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा देखील मृत्यू झाला आहे. विमानातील क्रू मेंबर पिंकी माळी आणि कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला आहे.