एक्स्प्लोर

Ajit Pawar Death Plane Crash: अजितदादांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले...

Ajit Pawar Death Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

Ajit Pawar Death Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28) विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन (Ajit Pawar Death Plane Crash) झालंय. एकीकडे पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना, दुसरीकडे येणाऱ्या दिवसांत हेच पवार कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार आहे. अजित पवारांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला (NCP Ajit Pawar Faction) नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुढील काळात अजित पवार गटाची दिशा, निर्णयप्रक्रिया आणि राजकीय रणनिती काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? या शक्यतेवर आता राष्ट्रवादीतील नेते भाष्य करीत आहेत.  

Shashikant Shinde : नेमकं काय म्हणाले शशिकांत शिंदे? 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. “आता सत्य बोलणं गरजेचं आहे. महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ, असं अजित पवार म्हणाले होते. त्या अनुषंगाने बैठकाही झाल्या. अजितदादा हे शरद पवारांकडे पाहूनच हे बोलत होते. आता त्यादृष्टीनंच आमची वाटचाल होईल,” असं सूचक विधान शशिकांत शिंदे यांनी केलंय. दरम्यान, अजित पवार यांनीही यापूर्वी एका जाहीर सभेत, “आम्ही एकत्र आलो की काही लोकांच्या पोटात दुखायला का लागतं?” असा सवाल उपस्थित करत एकत्र येण्याच्या चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला होता.

NCP Crisis: आता पुढे काय होणार?

पुढील काही दिवसांत खासदार सुनेत्रा पवार यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याकडे संघटनात्मक किंवा थेट राजकीय अनुभव नसल्याने ही बाब पक्षासाठी अडचणीची ठरू शकते. तसेच, मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडेही नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याइतका पुरेसा अनुभव नसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सकारात्मक आणि नकारात्मक—दोन्ही शक्यता सध्या नाकारता येत नाहीत. भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा पर्याय स्वीकारला होता. त्यामुळे शरद पवार जर भाजपासोबत युतीसाठी तयार असतील, तरच हे नेते त्यांना साथ देतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ajit Pawar: अजित पवार अनंतात विलीन

दरम्यान,  राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहेचा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून ते विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या अखंड प्रेमाची साक्ष देत होता.

आणखी वाचा 

Ajit Pawar and Sharad Pawar: शरद पवारांच्या समोर कायमचे शांत झोपलेले 'दादा'; उभ्या महाराष्ट्राचं काळीज चिरणारं चित्र, पाहा VIDEO

महत्त्वाच्या बातम्या

तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
धनंजय महाडिक, आधी भीमा साखर कारखान्यावर फेरी मारा, कामगारांना पगार नाही, कारखान्यावर जप्ती, सतेज पाटलांचा हल्ला
धनंजय महाडिक, आधी भीमा साखर कारखान्यावर फेरी मारा, कामगारांना पगार नाही, कारखान्यावर जप्ती, सतेज पाटलांचा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
Embed widget