Ajit Pawar Death Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आज (29 जानेवारी) बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी कालपासून बारामतीत मोठा जनसागर लोटलाय. अजित पवारांच्या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच पवार कुटुंबावर जणू वीजेचा लोळ कोसळला. (Ajit Pawar Dead Baramati Plane Crash)
अजित पवार खाजगी विमानाने काल सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. सकाळी 8.45 च्या दरम्यान ही सगळी घटना घडली. अजित पवारांचं विमान कोसळल्याची सुरुवातीला कोणतीच अधिकृत माहिती समोर येत नव्हती. मात्र काही मिनिटांनंतर विमान कोसळ्याची माहिती समोर आली. परंतु अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती सगळ्यात आधी माजी मंत्री आणि शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांना मिळाली. याबाबत खुद्द राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं. (Ajit Pawar Dead Baramati Plane Crash Marathi News)
राजेश टोपे नेमकं काय म्हणाले? (Rajesh Tope On Ajit Pawar)
अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती मीडियाकडेही नव्हती, त्याआधी माझ्याकडे होती. आमच्या जिल्ह्यातील एक तरुण बारामती विमानतळावर स्टोअर रुममध्ये कामाला आहे. त्याने मला सकाळी फोन करुन सांगितले की अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आहे. विमानाचं शेवटचं टोक फक्त दिसतंय, बाकी सगळं जळून खाक झालंय, असं राजेश टोपे यांनी म्हणाले. आज माझा वडील-भाऊ गेल्याची भावना व्यक्त करत राजेश टोपे भावूक झाले.
अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं आपल्या हक्काचा माणूस गेला- (Ajit Pawar Death Baramati)
बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला त्यावेळी जवळपास संपूर्ण पवार कुटुंब दिल्लीत होतं. अर्थसंकल्पीय अधिवेशासाठी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत होत्या. पार्थ पवारही त्यांच्यासोबतच दिल्लीतच होते. अजित पवारांच्या अपघाताची बातमी मिळताच पवार कुटुंबानं बारामतीकडे धाव घेतली. दोन्ही पवार कुटुंबातील दुवा असणाऱ्या अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं संपूर्ण पवार कुटुंबाची जणू वीण उसवलीय. तर राजकारण ते समाजकारण असा प्रवास लीलया पेलणाऱ्या अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं आपल्या हक्काचा माणूस गेला. केवळ हीच भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे.
सकाळी 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार- (Ajit Pawar funeral)
अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमध्ये असलेल्या काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजेपर्यंत पार्थिव काटेवाडीमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर अँब्युलन्स ने पार्थिव ग. दि. मा. संभागृपर्यंत नेण्यात येईल. सकाळी 9 पासून येथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि तिथून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्ययात्रा समाप्त होईल. सकाळी 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
