Ajit Pawar Death Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आज (29 जानेवारी) बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Ajit Pawar funeral baramati) केले जाणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी कालपासून बारामतीत मोठा जनसागर लोटला आहे. अजित पवारांच्या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच पवार कुटुंबावर जणू वीजेचा लोळ कोसळला. (Ajit Pawar Dead Baramati Plane Crash) अजित पवार खाजगी विमानाने काल सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. यादरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Ajit Pawar funeral baramati)
अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडी करण्याची शक्यता- (CID likely to investigate Ajit Pawar plane crash)
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडी करण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासह पाच जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकस्मात मृत्यूची नोंद करत गुन्हा दाखल केला आहे. कुठल्या ही उच्चपदस्थ व्यक्ती यांच्या अकस्मात मृत्यूचा तपास सीआयडी ही तपास यंत्रणा करते. त्यामुळे या अपघाताचा तपास सुद्धा गुन्हे अन्वेषण विभागाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं काय घडलेलं, याची माहिती समोर येत आहे.
सकाळी 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार- (Ajit Pawar funeral baramati)
अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमध्ये असलेल्या काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजेपर्यंत पार्थिव काटेवाडीमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर अँब्युलन्स ने पार्थिव ग. दि. मा. संभागृपर्यंत नेण्यात येईल. सकाळी 9 पासून येथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि तिथून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्ययात्रा समाप्त होईल. सकाळी 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
अजित पवारांच्या विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम- (How did Ajit Pawar plane crash?)
- पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
- बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे
- ILS (Instrument Landing System) सुविधा नाहीत.
- पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
- विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
- याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
- धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
- दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
- DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
- लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
- सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला
- रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले
- आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
- विमानात भीषण आग लागली
- आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही
- अपघाताचा तपास चालू आहे; DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.
