Ajit Pawar Death Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवारयांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू (Ajit Pawar Death Plane Crash) झालाय. बारामतीचे ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे त्यांच्या कडक शिस्तीच्या, थेट आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जायचे. “एकदा एखादं काम करायचं ठरवलं की ते करतोच; पण जे काम होणार नसेल, ते कोणी कितीही जवळचं असो, तरी करत नाही,” हे वाक्य अजितदादांच्या दराऱ्याचं प्रतीक मानलं जातं. याच दराऱ्याची आणि त्यामागच्या मानवी बाजूची झलक दाखवणारा बारामतीतील एक किस्सा दादांच्या निधनानंतर चर्चेत आलाय.
Ajit Pawar Death Plane Crash: सरपंच भेटीसाठी आला, पण आधी चिठ्ठी पाठवली
अजित पवार बारामतीत असताना एका गावचा सरपंच काही गावकऱ्यांसह त्यांना भेटायला आला होता. मात्र, प्रत्यक्ष भेट होण्याआधीच सरपंचाने एक चिठ्ठी दादांकडे पाठवली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की, “दादा, मला माहिती आहे की हे काम होणार नाही. पण गावकऱ्यांच्या आग्रहामुळे मला यावं लागत आहे. एकच विनंती आहे… कृपया मला त्यांच्या समोर शिव्या देऊ नका.” ही चिठ्ठी वाचताच अजितदादांनाही हसू आवरता आलं नाही. कडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या दादांनी त्या क्षणी खळखळून हसत वातावरण हलकं केलं.
Ajit Pawar Death Plane Crash: नीलेश देशमुखांनी सांगितला किस्सा
हा किस्सा बारामती नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितला आहे. 2015 ते 2017 या काळात देशमुख बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी होते आणि त्यांचा अजित पवार यांच्याशी नियमित संपर्क होता. एका प्रकल्पासंदर्भात चर्चा सुरू असताना हा सरपंचाचा प्रसंग घडला. “दादांनी ती चिठ्ठी मला वाचायला दिली. ती वाचून मलाही हसू आलं. मात्र, ‘आपल्या पक्षाचा सरपंच आहे, त्याला नाराज नको करायला,’ असं म्हणत दादांनी त्याला आणि गावकऱ्यांना भेटीसाठी बोलावून घेतलं,” असे देखील देशमुख यांनी सांगितले.
Ajit Pawar Death Plane Crash: कडक शब्द, पण स्पष्ट कारण
भेटीत अजित पवारांनी आपल्या खास शैलीत त्या कामात नेमकी अडचण काय आहे, ते का शक्य नाही, हे सरपंच आणि गावकऱ्यांना समजावून सांगितलं. कोणताही गैरसमज न ठेवता, वस्तुस्थिती थेट मांडण्यावर दादांचा नेहमीच भर असायचा.
Ajit Pawar Death Plane Crash: प्रत्येकाकडून काम करून घेण्याची कला
नीलेश देशमुख यांनी पुढे म्हटले की, “स्वच्छता, रस्ते, विकास आराखडा याबाबत अजित पवार अत्यंत आग्रही असायचे. अधिकाऱ्यांच्या कामात अनावश्यक ढवळाढवळ त्यांना अजिबात आवडत नसे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाकडून काम करून घेण्याची कला त्यांच्याकडे होती. प्रत्येक निर्णय ते भविष्याचा विचार करून घ्यायचे,” असे देखील त्यांनी सांगितले.
आणखी वाचा
