Ajit Pawar and Jay Pawar: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने त्यांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत अजितदादांच्या निधनापूर्वीच्या काही घडामोडींविषयी भाष्य केले. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शेवटच्या दिवसांतील काही आठवणी सांगताना जय पवार यांचा कंठ दाटून आला होता. (Ajit Pawar Plane Crash) यावेळी त्यांनी अनेक आठवणी आणि जुने किस्से सांगितले आहेत, जय पवार यांनी ज्यावेळी लग्न करायचे होते तेव्हा आपली पत्नी ऋतुजा पाटीलबाबत (Rutuja Patil) कसं सांगितलं, दादांची काय प्रतिक्रिया होती, याबाबत देखील त्यांनी माहिती दिली आहे.(Ajit Pawar)
जय पवार म्हणाले की, सोमवार ते गुरुवारी दादा मुंबईत असायचेच. दादांचा आवाज असा आला की, आम्ही एकदम अटेन्शन मोडवर असायचो. पण तसं बघायला गेलं तर माझी आणि पार्थ दादांची छोटे असताना भांडणं खूप व्हायची. वहिनी सांगायच्या दादांचा फोन आलाय किंवा डॅडचा फोन आलाय, तर तिथल्या तिथे आमची भांडणं थांबायची. दादा जसे कठोर होते, तसंच त्यांचं प्रेमही भरपूर होतं. ऋतुजाबद्दल पण मी दादांना सांगितलं की असं असं आहे, महाराष्ट्रीयन आहे आणि मला वाटतं मला लग्न करायचं आहे. दादा हसले आणि बोलले, "नक्की का?" अशा प्रकारे लग्नाचा किस्सादेखील जय पवारांनी सांगितला आहे.
Jay Pawar: ऋतुजाबद्दल पण मी दादांना सांगितलं की,....
दादांपासून कधीच काही लपवलं नाही, कारण दादा माझे मार्गदर्शक होते. त्यामुळे मी दादांपासून कधीच काही लपवलं नाही. आता मी तुम्हाला सांगतो, माझं लग्न झालंय ऋतुजाबरोबर. ऋतुजाबद्दल पण मी दादांना सांगितलं की, असं असं आहे, महाराष्ट्रीयन आहे आणि मला वाटतं मला तिच्याशी लग्न करायचं आहे. दादा हसले आणि बोले, "नक्की का?" मग त्यांनी... दादा तर सगळ्यांना ओळखतातच, त्यामुळे दादांनी काही दिवसांनंतर सांगितलं की, "कुटुंब चांगलं आहे, आपण भेटूया." त्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही की दादांपासून काही लपवायची गरज आहे.
Jay Pawar: दादांना गाडी चालवायला खूप आवडायची....
आमच्या बोर्डिंग स्कूलच्या पेरेंट्सनी, म्हणजे आमच्या डॉम पेरेंट्सनी दादांना फोन लावला आणि पहिल्यांदा दादा तिथे आम्हाला, म्हणजे मला दिसले. दादा माझ्यावर एवढे ओरडले की, "असं नसतं." एका होमवर्कसाठी ते एवढे ओरडले की ते माझ्या मनात अजूनही आहे. दादांना गाडी चालवायला खूप आवडायची. कधी कधी त्यांच्याबरोबर एक मुलाचं नातं म्हणून आपण बोलतो ना की, "थोडी फास्ट चालवा", तरी दादा शिस्त पाळायचे. कधी थोडा वेळ मिळाला तर ते पळवायचे. तो अतिशय चांगला दिवस होता. दादांची परेड बघितली, पोलीस ग्राउंडवर गेलो, दादांचं भाषण ऐकलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं परत जिजाईला गेलो. मी म्हणालो, "डॅड, बस ना आता! तुम्ही किती काम करणार? किती कष्ट घेणार?" तेव्हा दादा बोले की, "जयड्या, ही शेवटची निवडणूक आहे आणि याच्यानंतर आपण सर्व सुट्टीवर जाऊ." पण तो दिवस कधी आलाच नाही... मला सकाळी पार्थ दादाचा फोन आला की, असं असं झालंय. मग स्वतः गाडी चालवत मी मेडिकल कॉलेजला पोहोचलो आणि मला वाटतं मीच कुटुंबातील पहिला व्यक्ती होतो, ज्याने दादांना पहिलं बघितलं. वहिनी विमानात होत्या, तेव्हा दादांचं पोस्टमॉर्टम करायचं की नाही असा निर्णय घ्यायचा होता. कधीच वाटलं नव्हतं की दादा आपल्याला असे सोडून जातील, असं पुढे जय पवार यांनी म्हटलं आहे.
Jay Pawar: दिवाळीत आम्ही बारामतीत असायचो. दादा आम्हाला दोघांना...
खरं तर बोलायला गेलं तर दादा आमच्यासाठी एक वडील म्हणून खूप कठोर होते. म्हणजे एवढे स्ट्रिक्ट असायचे की, आम्ही सगळेच त्यांना एकदम घाबरून असायचो. शाळेतून जेव्हा आम्ही घरी यायचो, तेव्हा क्वचितच दादा भेटायचे; कारण ते जास्त करून दौऱ्यावरच असायचे. सोमवार ते गुरुवारी दादा मुंबईत असायचेच. कधी आम्ही घरी आलो आणि दादांचा आवाज आला की, आम्ही एकदम अटेन्शन मोडवर असायचो. सुरुवातीला दादा कठोर होते, पण जशी-जशी वेळ पुढे जात गेली, तसे दादा एकदम शांत झाले. वडील म्हणून त्यांचं आमच्या दोघांवरती खूप प्रेम होतं. दिवाळीत आम्ही बारामतीत असायचो. दादा आम्हाला दोघांना... म्हणजे एकही दिवाळी अशी झाली नाही की, आम्ही बारामतीत आलो नाही. दिवाळी हा एक असा क्षण असायचा की आम्हाला सुट्ट्या असायच्या. तेव्हा सुट्टीच्या वेळेस आम्हाला दोघांना वाटायचं की थोडं उशिरा उठूया, पण दादा रोज सकाळी सहा वाजता आमच्या दरवाजाचा हँडल नुसता खाली करायचे; तेवढ्यात आम्ही दोघं एकदम असे उठून उभे राहायचो. आज त्यांची आठवण आम्हाला हसवते. पण तसं बघायला गेलं तर माझी आणि पार्थ दादांची छोटे असताना खूप भांडणं व्हायची. भावंडांत जशी भांडणं होतात तशीच! दादांचा कधी जरी वहिनीला फोन आला आणि वहिनींनी सांगितलं की, "दादांचा फोन आलाय" किंवा "डॅडचा फोन आलाय", तर तिथल्या तिथे आमची भांडणं थांबायची. एवढं आम्ही दादांना घाबरायचो, अशी लहानपणीची आठवणदेखील सांगण्यात आली.
त्यांचा आवाजच एवढा कडक होता की, कुठे काय आपण चुकीचं नाही करायला पाहिजे याची जाणीव व्हायची. दादांच्या मनात आधीपासूनच एक भावना होती की, चुकीचं काही करायचं नाही. म्हणजे आम्हाला दादांनी कधीच असं वाटून दिलं नाही की आम्हाला सगळं सहजासहजी मिळालं. लहान असताना वाटायचं की, कधीतरी दादांना एक वडिलांचं नातं म्हणून काहीतरी गिफ्ट मागावं, तर दादा बोलायचे, "तुमचं शिक्षण झाल्यावर, मोठे झाल्यावर स्वतःच्या कमाईने घ्यायचं." दादांनी आमच्या दोघांचे पाय कायम जमिनीवर ठेवले. घरातले दादा जेव्हा चांगल्या मूडमध्ये असायचे, तेव्हा खूप चांगल्या मूडमध्ये असायचे; सगळ्यांना हसवायचे. कुटुंबाचं, सर्वच नातेवाईकांचे प्रेम खूप होतं दादांवर. दिवाळीत पण सगळ्यांना एकत्रित घेऊन यायचे. आमचे भाऊ-बहीण असू दे किंवा दादांचे भाऊ-बहीण असू दे, सगळ्यांना एकत्रित घेऊन दादा दिवाळी साजरी करायचे, अशी आठवणदेखील जय पवार यांनी सांगितली.
Jay Pawar: मी माझ्या आजोबांना कधी बघितलं नाही
माझ्या मनातली एक भावना आहे की, मी माझ्या आजोबांना कधी बघितलं नाही. म्हणजे तात्यासाहेब आजोबांना कधी बघितलं नाही आणि वहिनींचे वडील, म्हणजे आमचे दुसरे आजोबा, त्यांचंही मी छोटा असतानाच दुःखद निधन झालं. पण माझ्या मनात कुठेतरी होतं की, दादा तरी माझ्या मुलांना हातात घेऊन खेळवतील, माझ्या मुलांना आजोबा असतील. दादांनी तर कायम आम्हाला शिकवलंय की कडकच राहायचं, कधी इमोशनल व्हायचं नाही. पण दादांनी एक स्थिरता शिकवली आहे की, आपण आपल्या जनतेसाठी कसं लढायचं, त्यांच्यासाठी कसं ठाम उभं राहायचं. त्यामुळे त्यांची तीच एक शिकवण सारखी मनात येते. त्यांचा आवाज, दादांचा आवाज तर मनात सारखा येतो, असंही पुढे जय पवार यांनी म्हटलं आहे.
Jay Pawar: अजितदादांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' सिटीस्कॅन मशीननेच...
28 जानेवारीला मला सकाळी पार्थ दादाचा फोन आला, असं असं झालंय. मी फोन कट करुन गाडीत बसलो आणि स्वत: गाडी चालवत मेडिकल कॉलेजला पोहोचलो. मला वाटतं, अजितदादांचा मृतदेह पाहणारा पवार कुटुंबातील पहिली व्यक्ती मीच होतो. तिकडे पोहोचल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. दादांचं पोस्टमार्टेम करायचे की नाही? त्यावेळी पार्थ दादा आणि सुनेत्रा वहिनी विमानात होते. त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. मात्र, पोस्टमार्टेम महत्त्वाचे असल्याने तो निर्णय घ्यावा लागला. आम्ही दादांना घेऊन पोस्टमार्टेमसाठी गेलो. काही महिन्यांपूर्वीच दादांनी त्या सीटीस्कॅन मशिनचं उद्घाटन केले होते, त्याच रुममध्ये दादांचा मृतदेह स्कॅन करत होते. कधी असं वाटलं नव्हतं, अशी वेळ येईल दादा असे सोडून जातील, असे जय पवार यांनी सांगितले.
Jay Pawar: अजित पवार म्हणाले, ही निवडणूक शेवटी, मग आपण सुट्टीवर जाऊ: जय पवार
या मुलाखतीत जय पवार यांनी अजितदादांच्या शेवटच्या दिवसांतील काही आठवणी सांगितल्या. दादांशी आमचं शेवटचं बोलणं 27 तारखेला झालं, आमची शेवटची भेट 26 जानेवारीला झाली होती. का माहिती नाही, तो दिवस वेगळाच होता. त्यादिवशी मी सकाळी सात वाजता जिजाई बंगल्यावर पोहोचला. तिथे दादांची आणि माझी काही लोकांसोबत बैठक झाली. एरवी बैठक संपल्यावर मी माझ्या कामासाठी पुढे जायचो. पण त्यादिवशी मला मनातून वाटलं की, जिजाईमध्ये थोडं थांबायला हवं. मग दादांच्या आणखी दोन बैठका होईपर्यंत थांबलो. त्यानंतर ते 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निघत होते. तेव्हा मी दादांना सहज बोललो, मी येऊ का तुमच्यासोबत, ते म्हणाले तू काय करणार माझ्याबरोबर येऊन? मी त्यांच्यासोबत पोलीस ग्राऊंडवर गेलो, दादांची परेड बघितली, भाषण ऐकले. त्यानंतर आम्ही दोघं जिजाईला परत आलो. जिल्हा परिषद निवडणुका असल्यामुळे तेव्हा जिजाईवर भरपूर गर्दी होती. चार-पाच वाजताच्या सुमारास मी बंगल्याच्या हॉलमध्ये गेलो आणि म्हणालो, चार-पाच वाजता हॉलमध्ये गेलो, म्हणालो, डॅड बास ना आता तुम्ही किती काम करणार, किती कष्ट घेणार? तेव्हा दादा बोलले, जयड्या ही शेवटची निवडणूक आहे. याच्यानंतर आपण सर्व सुट्टीवर जाऊ. पण तो दिवस नाही आलाच नाही, असे जय पवार यांनी म्हटले.
