Chandrapur Municipal Election 2026: सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar)  यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात (Nagpur) भाजपच्या विदर्भ विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत दोघांमधील वाद सोडवण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. मात्र या बैठकीतही मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे. दरम्यान जोरदार शाब्दिक खडाजंगी झालेल्या या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय देखील झाल्याची माहिती आहे. (Chandrapur Municipal Election)

Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar : सुधीर मुनगंटीवार अन् किशोर जोरगेवार यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक

चंद्रपूर महापालिकेतील विविध प्रभागांमध्ये कोण कोण उमेदवार असावेत, यासाठी दोघांनीही आपापले नाव बैठकीत मांडल्याचे माहिती आहे. यातील बहुतांशी जागांसाठी दोघांनी आपापल्या गटातील इच्छुक उमेदवारांचे वेगवेगळे नाव सुचवल्याचीहीमाहितीआहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात दोघांनी सुचवलेल्या नावांबद्दल सर्वेक्षण करून पक्षाकडे रिपोर्ट सोपवायचा आहे. त्यानंतर सर्वेक्षण मधील माहिती आणि इलेक्टोरल मेरिटच्या आधारे पक्ष (निवडणूक निरीक्षक आणि प्रभारी) 28 डिसेंबर रोजी उमेदवारांचे नाव निश्चित करेल, अशीमाहितीआतासमोरआलीआहे.

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांकडून पक्षश्रेष्ठी पुढेचारनिकष

दरम्यान, या बैठकीत उमेदवार निश्चित करताना चार निकष वापरण्यात यावे, अशी अट ही सुधीर मुनगंटीवार यांनी घातल्याची माहिती आहे. त्यात एका कुटुंबात एकापेक्षा जास्त उमेदवारी दिली जाणार नाही. कुठल्याही नेत्याच्या निष्क्रिय मुलांना उमेदवारी दिली जाऊ नये. एक दोन महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी दिली जाऊ नये. उमेदवारी फक्त सर्वेक्षणच्या रिपोर्टच्या आधारे त्यामधील इलॅक्टोरयल मेरिटच्या आधारे दिली जाईल. अशासूचना सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षापुढेठेवल्याचीमाहितीआहे.

अशातच चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची पुन्हा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यातआलीआहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून त्यासंदर्भात नियुक्तीपत्र जारी करण्यात आले आहे. तर चैनसुख संचेती यांची चंद्रपूर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यातआलीआहे. चैनसुख संचेती (Chainsukh Sancheti) हे भाजपचे बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार आहेत. तर माजी खासदार अशोक नेते हे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून कायम ठेवण्यातआलेआहे.

Chandrapur BJP: बैठक अत्यंत शांततेत आणि शिस्तीत पार पडल्याचाभाजपचा दावा

नागपुरात विभागीय भाजप कार्यालयात आज सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महापालिकेबाबत भाजप कोअर कमिटीची खास बैठक पार पडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे निवडणूक प्रमुख किशोर जोरगेवार, माजी खासदार हंसराज अहिर, चंद्रपूरचे निवडणूक प्रभारी अशोक नेते तसेच चंद्रपूरचे भाजप निरीक्षक चैनसुख संचेती हे उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेली चंद्रपूर संदर्भातली ही बैठक चांगलीच वादळी झाल्याची चर्चा आहे. या बैठकीमध्ये काही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक ही झाल्याची माहिती आहे. मात्र, भाजपाचे नेत्यांनी बैठक अत्यंत शांततेत आणि शिस्तीत पार पडल्याचा दावा करत कुठलाही वाद झालं नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान बैठकीत सर्व निर्णय एकमताने झाल्याचे आणि चंद्रपूर मधील सर्व उमेदवार सर्वेक्षण करून त्यामधील इलेक्टोरल मेरिट नुसार निवडले जाणार असल्याची माहिती चंद्रपूरचे निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती यांनी दिली आहे.

Chainsukh Sancheti :  चैनसुख संचेती नेमकं काय म्हणाले?

येत्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरू आहे, युतीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय आहे, आणि संभाव्य उमेदवार सर्वेमध्ये ज्यांची नावे येतील, ज्यांचे मेरिट सर्वात जास्त असेल, अशा उमेदवारांना भाजप आणि शिवसेना तिकीट देतील, अशा प्रकारची बैठक झाली.एकूण 458 इच्छुक आहेत, ज्यांनी भाजपकडे 69 प्रभागांमध्ये उमेदवारी मागितली होती, आणि त्या सर्वांचा इंटरव्यू झालेला आहे. आजच्या परिस्थितीत भाजप एक दिलाने, एक मताने, पूर्ण ताकदिने निवडणूक लढणार आहे. एक दिलाने, एकमताने निर्णय होणार, प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचे निर्धार झाले आहे.

कोणत्याही प्रकारचा मतभेद कोणाकडेही दिसून आलेला नाही. कोणत्याही प्रकारचा वाद किंवा कोणत्या प्रकारची तशी चर्चा नाही. सर्वांचे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वच लोक आहेत आणि त्या लोकांनी आपापल्या मताने ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते नाव सुचवली आहे आणि या सर्व एकमताने, एक दिलाने सर्व नेते यांच्या उपस्थितीत आज हे सर्व निर्णय युतीचा ठरलेला आहे. अशीप्रतिक्रिया चैनसुख संचेती यांनीदिली.

Chainsukh Sancheti : या सर्व गोष्टी तथ्यहीन, असंकाहीहीनाही

दरम्यान, याची मला कल्पना नाही, मात्र सुरुवातीपासून मीच निवडणूक निरीक्षक आहे, आजही मी निरीक्षक म्हणून आहे. प्रभारी म्हणून अशोकजी नेते आहेत. तर कोणीही बैठक सोडून गेलेला नाही. जागा वाटप करणे ज्याचे इलेक्टिव्ह मेरिट असेल, सर्वेमध्ये ज्यांचे नाव असतील, त्यानंतर या सर्व गोष्टी ठरविण्यात येईल. राष्ट्रवादीसोबत राहणार का याबाबत आज तरी चर्चा नाही. बैठकीमध्ये काही वाद झाले (खडाजंगी झाली) या सर्व तथ्यहीन गोष्टी आहेत. सर्व नेते आहे, त्या सर्वांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवल्या जाणार आहेत आणि निवडणुकीचे प्रमुख म्हणून निरीक्षक म्हणून आम्ही या ठिकाणी काम पाहणार आहोत, आणि संघटनेचा जो निर्णय आहे ते पालन करणे हे आमचं कर्तव्य असल्याचेही चैनसुख संचेती म्हणाले. एकत्र बसून त्यांनी जे-जे नाव सजेस्ट करायचे, ते केले आणि एक मताने ठरवलं की ज्यांचा इलेक्ट्रोरल मेरिट समोर येईल, तो उमेदवार द्यायचा, असा ठरवलेलंअसल्याचेहीतेम्हणाले.

ही बातमी वाचा: