Anjali Damania on Parth Pawar: अजित पवारांच्या (Ajit Pawar) निधनानंतर केवळ तीन दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या प्रकरणावरून सकारात्मक तसेच नकारात्मक चर्चा सुरु आहेत. आता अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर पुण्यातील भूखंड घोटाळ्याशी (Pune Land Scam) संबंधित प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, “अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसांत शपथविधी घ्यायला काहीच हरकत नाही, पण ‘बिझनेस अज यूज्युअल’ असल्याने पुण्यातील जमीन घोटाळ्याची चौकशी थांबवली जाऊ नये.”
त्यांनी सरकारकडे दोन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत.
1 पार्थ पवारांविरोधात प्रलंबित FIR तात्काळ दाखल करावी.
2 खारगे आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक केला जावा.
पार्थ पवारांवर चौकशी सुरू असतानाच राज्यसभेचे खासदार बनवणे चुकीचे आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
Anjali Damania on Dhananjay Munde: अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
अंजली दमानिया यांनी आरोप केला की, सुनेत्रा पवारांच्या मागे काही नेते संधीसाधू वृत्तीने फिरताना दिसत आहेत. विशेषत: माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उल्लेख करून त्यांनी सांगितले, धनंजय मुंडेंही सुनेत्रा पवारांच्या पुढे मागे फिरताना दिसले. संधीसाधू माणूस, परत येण्याची तडफड दिसतेय, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.
Parth Pawar Pune Land Scam: पार्थ पवारांवर भूखंड घोटाळ्याचा आरोप
पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील मुंढवा कोरेगाव पार्क परिसरातील 1800 कोटींचा भूखंड अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केला असल्याचा आरोप आहे. ही जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनी ने खरेदी केली होती. या प्रकरणी शितल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला, परंतु अद्याप पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आता अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाला उजेडात आणून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आणखी वाचा