AISA Jantar Mantar Protest Against Gyanesh Kumar: निवडणूक आयोग आणि एसआयआर (SIR) बाबत झालेल्या सनसनाटी खुलाशानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात देशव्यापी संतापाचा उद्रेक झाला आहे. आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात आल्यानंतर AISA कडून जंतर मंतरवर ज्ञानेश कुमारांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनातून दिल्ली पोलिसांनी अनेकांना फरफटत नेत अटक केली आहे. राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांच्यासह नेहा बोरा यांनाही पोलिसांना ताब्यात घेत जंतर मंतर बंद केलं आहे.
योगेंद्र यादव यांच्यासह 40 हून अधिक आंदोलकांना अटक
AISA च्या नेतृत्वाखालील आंदोलनात मोठ्या संख्येने लोक जमले. दिल्ली पोलीसांकडून योगेंद्र यादव यांच्यासह 40 हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. प्रशांत भूषण, अंजली भारद्वाज आणि नेहा यांच्यासह विद्यार्थी आंदोलनासाठी जंतर मंतर येथे पोहोचले होते. दिल्ली पोलिसांनी त्यांना बॅरिकेड्सवर रोखले. दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर येथे सर्व आंदोलकांना अटक करून संपूर्ण रस्ता मोकळा केला. त्यांना आंदोलनाच्या ठिकाणी जाऊ दिले नाही. त्यांना 150 मीटर अंतरावर थांबवून अटक करण्यात आली आणि तेथून परत पाठवण्यात आले.
यापूर्वी, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने शुक्रवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करत जाहीर सभा घेतली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची मागणी केली. आयोजकांनी सांगितले की, 'द इंडियन एक्सप्रेस'च्या अलीकडील एका वृत्तामुळे भारतीय निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या आंदोलनात 'आयसा'च्या अध्यक्षा नेहा योगेंद्र यादव, आरजेडी खासदार मनोज झा, सीपीआयएमएल लिबरेशनचे दिपांकर भट्टाचार्य, वकील प्रशांत भूषण, अंजली भारद्वाज आणि नंदिता नारायण यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि प्रमुख व्यक्ती सहभागी झाले होते.
काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु
दुसरीकडे, आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केले. उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्सवर भेदण्याचा प्रयत्न केला. पाटण्यात पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारले. दुसरीकडे, कॉकरोच जनता पक्षाने जर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर ते 2 ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. सीजेपीने ज्ञानेश कुमार यांना 48 तासांची मुदत दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
