एक्स्प्लोर

Manikrao Kokate : अजित पवारांच्या तंबीनंतर कृषीमंत्री कोकाटे नरमले? कर्जमाफीच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून म्हणाले, 'मी सामान्य घरातून आलोय, हुशार किंवा मोठा...'

Manikrao Kokate : शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट बघतात. कर्जमाफीतून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर उडवतात, असे वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते.

Manikrao Kokate : शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट बघतात. कर्जमाफीतून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर उडवतात, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केले होते. तसेच 'भिकारीही एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देत आहोत. तरीही त्याचा गैरवापर केला जातो, असे वादग्रस्त वक्तव्य देखील माणिकराव कोकाटे यांनी याआधी केले होती. माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. तर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटे यांनी तंबी दिली होती. आता माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. मी हुशार किंवा मोठा माणूस नाही, चुका होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. 

नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे? 

बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या वक्तव्यावर खुलासा केलाय. मी हुशार किंवा मोठा माणूस नाही. सामान्य घरातून आलो आहे. त्यामुळे वागण्या-बोलण्यात चुका होऊ शकतात. मात्र, माझा हेतू प्रामाणिक आहे, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. 

शेतीमध्ये सरकारी खर्चाने भांडवली गुंतवणूक करण्याबाबत विचार 

दरम्यान,  शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक केल्याशिवाय शेतकरी आता शेती करू शकणार नाही. पैसे नसल्याने शेतकरी कर्ज काढतो आणि कर्जबाजारी होतो. तो सातत्याने अडचणीत आला, की सरकार मदत करत नाही. या परिस्थितीत तो निराश होऊन वेगळा विचार करतो. हे चक्र थांबविण्यासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करणे आवश्यक झाले आहे. सरकारी खर्चाने शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याबाबत विचार सुरू आहे. देशात 50 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. हवामान बदलामुळे शेतीपुढील आव्हाने वाढली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणे, नवीन तंत्रज्ञानाची त्याला माहिती देणे गरजेचे आहे. बदलत्या काळात शेती सुरक्षित कशी होईल, कमी खर्चात चांगल्या दर्जाचे उत्पादन कसे वाढवता येईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा 

Ajit Pawar & Manikrao Kokate: बैठकीला अर्धा तास उशीरा पोहोचले, माणिकराव कोकाटेंना पाहून अजितदादांचा पारा चढला, सगळ्यांदेखत पाणउतारा केला

Manikrao Kokate: अवकाळी, गारपीटग्रस्त भागातील पंचनामे लवकरच पूर्ण होतील, शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळेल; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं आश्वासन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget