मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  गेल्या 19 दिवसांपासून उपोषण करत आहेत. मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी मंगळवारी अंतरवाली सराटीवरुन निघाले होते. काल त्यांचा मुक्काम बीडच्या (Beed news) पाटोदा येथे होता. अद्यापपर्यंत मनोज जरांगे यांना मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी मिळालेली नाही, परवानगीसाठी प्रयत्न सुरू असतानाच जरांगे मुंबईकडे निघाले आहे, याबाबत आणि जरांगे करत असलेल्या टीकेबाबत एबीपी माझाच्या 'कॉफी विथ कौशिक'मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केली आहे. भुजबळ बोलताना म्हणाले की, तो पहिल्या पासून माझ्यावर बोलत आहे. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल होतं. मात्र त्याने नंतर बीड पेटवलं. हॉटेल पेटवलं. त्यानंतर बोलायला मी सुरुवात केली. त्यानंतर मोठ-मोठा सभा घेतल्या. ओबीसी ताकद त्यानंतर लक्षात आली. 

Continues below advertisement

तर जरांगेंच्या टीकेबाबत आणि शिवराळ भाषेतील मंत्रिमंडळ बैठकीत रोष व्यक्त करण्यात आला याबाबत छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या वडिलांवरून बोलतात, बावनकुळे यांच्या आईबाबत बोलले. इतरांना घाण घाण बोलले. काल मात्र प्रत्येकजण मंत्रीमंडळ बैठकीत बोलायला लागला. हा किती घाणेरडा बोलतो आहे. ही नॉनस्टॉपेबल गाडी आहे. वाढतच चालली आहे, असंही पुढे भुजबळ यांनी म्हटलं आहे.

मंत्रीमंडळ बैठकीवेळी ईनसाईड स्टोरी सांगताना भुजबळ म्हणाले.....

मंत्रीमंडळ बैठक झाल्यानंतर सर्व अधिकारी बाहेर गेल्यानंतर जवळपास प्रत्येक जण बोलायला लागला, मी नावं घेत नाही, पण प्रत्येकजण म्हणत होता, नेमकं काय चाललं आहे, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, सगळ्यांविषयी किती घाण बोलतो हा, त्या जिल्हाधिकारी मॅडम गेल्या तिथे तेव्हा किती घाण बोलला तो, असं सांगता येणार नाही, सगळ्या गोष्टी आपण त्याच्या मान्य करतो तरीदेखील ही नॉनस्टॉपेबल गाडी चालूच आहे. सगळे याबाबत बोलले मी म्हटलं देर आये दुरूस्त आये आपण कशाला जास्ती बोला, असंही भुजबळांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

अख्खं बीड शहर पेटवलं, आमदारांची घर पेटवलं, कार्यकर्त्यांची हॉटेल पेटवली, पोलिस काहीच करत नव्हते, हतबल झाले होते. मग मी ते पाहायला गेलो, मी पाहायला जाणारा कदाचित पहिलाच होतो, नंतर बाकी गेले, मुंडे ते, मी म्हटलं आता मी शांत बसणार नाही, शांतंतेत चालू होतं तोवर ठिक होतं, पण आता आमदारांची घर जाळत आहात, हॉटेलची राख करत आहात, कोणी काही बोलत नाही, चर्चा करत नाही, मी जाहीर केलं मी तिथे अंबडमध्ये जाहीर सभा घेणार, आणि राजीनामा पाठवून दिला, एक समाजासाठी काहीतरी काम करतो म्हणून एकनाथ शिंदेंनी सहकार्य केलं असेल, त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, याचा अभ्यास नाही, १३ मागण्यापैंकी १२ मागण्या मंजूंर केल्या, एक मागणी कायद्यात बसत नाही आम्ही काय करणार, आणि ते थांबत नाहीत, कुठंपर्यंत आपण कायद्याला सोडून काम करायचं, मी एक पत्रकार परिषदेत बोललो होतो, महायुतीच्या सरकारने लक्षात घेतलं पाहिजे, की तुम्ही सांगितलं, ६० ते ७० टक्के ओबीसींनी आम्हाला मतदान केलं आहे, तर ते नाराज होणार नाहीत आपल्यावर याची काळजी आपण घेतली पाहिजे, असंही भुजबळांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मुळात जरांगे यांचा काहीच अभ्यास नाही. त्यांच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या देखील मान्य झाल्या आहेत. मराठा समाजाला निधी देखील देण्यात आला आहे. माझी मागणी आहे जे मराठा समाजाला देतात तसे ओबीसीला देखील द्या, तर निवडणुकीमध्ये शिंदेना मदत झाली का? यावरती बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, मला वाटत नाही, शिंदेना जरांगे यांची मदत झाली. लाडकी बहीण असो किंवा अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे लोक होते ना. मुळात याने निवडणुकीला फॉर्म मागवले लोकांना बोलावलं आणि अचानक माघार घेतली आणि त्यानंतर फक्त येवल्याला येऊन बसला माझ्या विरोधात तरी देखील मी निवडून आलो, असंही पुढे भुजबळांनी म्हटलंय.

तर गणेशोत्सवावर कुणाचा प्रभाव जास्त आहे यावरती उत्तर देताना छगन भुजबळांनी म्हटलं की, नकारात्मक दृष्ट्या पाहिल तर जरांगे आणि सकारात्मक पाहिलं तर बापट. त्याचबरोबर अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच होतं, ते आता परत मिळायला पाहिजे असं मला वाटतं. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला पाहिजे का? यावरती छगन भुजबळ म्हणाले की, जरूर मिळालं पाहिजे, का नाही, एका मोठ्या समाजाचे ते देखील नेते आहेत, पक्षाकडे किती जागा आहेत किती जागा भरतात त्यावरती अवलंबून आहे, शेवटी पक्षाचे प्रमुख निर्णय घेणार असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.