Politicians Got Threaten From Bishnoi Gang: बॉलिवूड (Bollywood News) कलाकारांनंतर बिष्णोई गँगनं (Lawrence Bishnoi Gang) आपला मोर्चा आता राजकारण्याकडे वळवला आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील आमदारांनी फोन करून खंडणीसाठी त्यांना धमकावलं जात असल्याचं तपासात समोर आलंय. विशेष म्हणजे, रोहित शेट्टीच्या गोळीबार प्रकरणानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू असताना, दुसरीकडे बिष्णोई गँगचे प्रताप काही थांबण्याचं नाव घेत नाहीत, या गँगकडून अकोल्यातील 2 आमदारांना धमकावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यात काँग्रेसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना शुभम लोणकर यांच्या नावानं धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Continues below advertisement

आमदार साजिद खान पठाण यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. तसेच, पूर्ण पैसे न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. तर दुसरीकडे अकोलातील अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांचा निकटवर्तीय हरीश टावरी यालाही बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आल्याचं कळतंय.

आमदार साजिद खान पठाण यांना फोनवरून 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, जर पैसे दिले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली होती. आमदार साजिद खान यांनी ही बाब जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळवली आहे आणि कॉल रेकॉर्डिंग सादर केले आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडून शस्त्र परवाना मागितला आहे.

Continues below advertisement

विशेष म्हणजे, त्यांनाही फोनवरील व्यक्तीनं बिष्णोई गँगकडून शुभम लोणकर बोलत असल्याचं सांगत 2 कोटींची धमकी दिली आहे. या दोन्ही प्रकरणाची दखल मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम लोणकर हाही अकोलाच्या अकोट येथील नेहरी बुद्रुगचा आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून त्याचं घर बंद असून सर्व कुटुंबीय पुण्यात रहायला गेले, या दोन्ही प्रकरणानंतर बॉलिवूडनंतर बिष्णोई टोळीनं आपला मोर्चा राजकीय व्यक्तींकडे वळवल्याची चर्चा रंगली आहे. 

रोहित शेट्टीच्या गोळीबार प्रकरणात शुभम लोणकर व्यतिरिक्त आणखी एक नाव

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणातील पोलिस तपासादरम्यान एक नवी अपडेट समोर आली आहे. शुभम लोणकर व्यतिरिक्त, आरजू बिश्नोईचं नावही समोर आलं आहे. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, आरजू बिश्नोई अटक केलेल्या आरोपींच्या संपर्कात होता. शुभम लोणकर आणि आरजू बिश्नोई यांना या प्रकरणात वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sanjay Raut and Dada Bhuse: दादा भुसेंनी राऊतांविरोधात बदनामीचा दावा ठोकला, पण कोर्टात जाताना दोघेही हसत हसत एकत्र पोहोचले; नेमकं काय घडलं?