मुंबई : देशभरात सध्या आंदोलनाचीच चर्चा असून महाराष्ट्रातील पुणे शहरात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने (Agitation) वातावरण तापलं असताना, दुसरीकडे राजधानी दिल्लीत काँग्रेसही आक्रमक झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून काही मार्गांवर रेल्वे, मेट्रो बंद करण्यात आले असून पोलिसांचा (Police) मोठा फौजफाटा तैनात आहे. आता, त्यावरुन शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) सरकारवर हल्लाबोल केला आहे.   

Continues below advertisement

देशात आता अप्रत्यक्ष आणीबाणी चालू आहे, भाजप यावर बोलत नाही. मुंबई आणि महाराष्ट्राची यांना भीती आहे, लोकांना ताब्यात घेत आहेत, नोटिसा पाठवत आहे. या देशात आणीबाणी लागू केली आहे, याबाबत बोलायची हिंमत नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. दिल्लीतील आंदोलनास आम्हीही पाठिंबा दिलेला आहे, आमचे नेते संजय राऊत दिल्लीत आहेत, गद्दार ज्ञानेश कुमार गेलेच पाहिजेत. पुण्यात हजारो आंदोलक बसले आहेत, त्यांचा घरीही दुष्काळाची झळ आहे. मात्र, पेपर फोडणाऱ्याला हे काढत नाहीत. मुख्यमंत्री आपल्या मित्राला का वाचवत आहेत? असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. 

शिवसेना पक्ष आणि चिन्हाची लढाई मागील 4 महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, आता कुठे तरी वाटू लागलं आहे, न्याय मिळायला उशीर होईल पण न्याय मिळेल अशी अपेक्षाही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली. 

Continues below advertisement

दिल्लीत कॉकोरच जनता पार्टीचं आंदोलन

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'कॉकरोच पार्टी' 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलन करणार आहे. 2 ऑक्टोबरच्या रात्री, दीपके यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, जर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर देशभरातील कॉकरोच दिल्लीत पोहोचतील. त्याने असेही म्हटले की, जर दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतरपर्यंत पोहोचण्यापासून रोखले, तर त्यांना जिथे थांबवले जाईल तिथे जंतर मंतर उभारले जाईल.

दिल्लीत काही मेट्रो आणि मेल एक्सप्रेस रद्द

नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर येणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या उद्या रद्द करण्यात येतील. रेल्वेने या गाड्या त्यांच्या मूळ स्थानकांवरूनच रद्द केल्या आहेत. सीजेपी आणि डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी सरकारवर देशभरात समर्थकांना ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 57 मेट्रो स्थानके बंद करण्याचा आणि 10 नजरबंदी केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा

CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड