एक्स्प्लोर

Abu Azmi on MNS Mira Bhayandar Morcha : मनसे कार्यकर्त्यांकडून टॅक्सी, रिक्षाचालकांना मारहाण, आजपर्यंत कुठलीही कठोर कारवाई नाही; अबू आझमींचा मनसेवर जोरदार हल्लाबोल

Abu Azmi on MNS Mira Bhayandar Morcha : मीरा भाईंदरमधील मनसेच्या मोर्चावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Abu Azmi on MNS Mira Bhayandar Morcha : मिरा-भाईंदर शहरात सध्या मराठी भाषेवरून वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेच्या एका कार्यकर्त्याने एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर, २ जुलै रोजी हजारो हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी त्या हिंसेच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. या मोर्चाला भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात आला. त्याच्या प्रत्युत्तरात, मनसेने मराठी भाषिक नागरिकांचा मोर्चा (MNS Mira Bhayandar Morcha) काढण्याची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर मनसेने मंगळवारी (दि. 08) मीरा-भाईंदरमधील बालाजी हॉटेलपासून रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी (Police) मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या. काल रात्री मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच मोर्चाच्या ठिकाणी कार्यकर्ते जमल्यावर पोलिसांकडून त्यांची धरपकड करण्यात आली होती. मात्र, काही वेळाने हा मोर्चा निघाला. आता या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी मनसेवर जोरदार हल्लाबोल केलाय. 

नेमकं काय म्हणाले अबू आझमी?

अबू आझमी म्हणाले की, "मनसेच्या लोकांनी कायद्याची पायमल्ली केली आहे. त्यांना वाटते की, कोणतीही सरकार आले, तरी त्यांच्या विरोधात कारवाई होत नाही. याआधीही मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मारहाण केली होती आणि काही हत्या देखील झाल्या. पण, आजपर्यंत मनसेवर कुठलीही कठोर कारवाई झालेली नाही. अलीकडेच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मीरा रोडमध्ये एका दुकानदाराला मारहाण केली. पण, सुदैवाने तो दुकानदार ताकदवान होता. तो टॅक्सी किंवा रिक्षाचालक असता, तर एवढे लोक एकत्र आले नसते. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. मराठीचा अपमान कोण करत आहे, हे पाहायला हवे आणि जो अपमान करतोय, त्याच्यावरच कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तसेच अबू आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जो कोणी असेल, त्याच्यावर कायदा बळकटीने लागू केला गेला पाहिजे, अशी विनंती देखील केली आहे. 

प्रताप सरनाईकांचं पोलिसांना आव्हान

दरम्यान, मीरा रोडवर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. यानंतर परिवहन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. प्रताप सरनाईक हे तातडीने मीरा रोडवर जायला निघाले. याबाबत प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की, शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला होता. काल मराठी एकीकरण समितीचे नेते गेले तेव्हा त्यांना परवानगी नाकारली. काही लोकांना तडीपारीच्या नोटीसेस दिल्या. पोलीस आयुक्तांसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. आमदार म्हणून मी हे सहन करणार नाही. मी मोर्चामध्ये सामील व्हायला निघालो आहे. मला पोलिसांनी अडवून दाखवावे, असे आव्हान त्यांनी पोलिसांना दिले आहे. 

आणखी वाचा 

MNS Morcha Mira Bhayander: मोठी बातमी : मोर्चाला परवानगी नाकारुन सरकारच्या बदनामीचा हेतू आहे का? मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना विचारला जाब!

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: सकाळ उजाडताच ठाण्यातील गुप्त बैठकीची अफवा उठली, ठाकरेंचे खासदार फुटल्याची चर्चा, एकनाथ शिंदे स्पष्टच म्हणाले...
सकाळ उजाडताच ठाण्यातील गुप्त बैठकीची अफवा उठली, ठाकरेंचे खासदार फुटल्याची चर्चा, एकनाथ शिंदे स्पष्टच म्हणाले...
Rohit Pawar on Ajit Pawar plane Crash: रोहित पवारांकडून विमानांबाबत धोक्याचा इशारा, तरीही महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, मालक स्वत: स्वागताला
रोहित पवारांकडून विमानांबाबत धोक्याचा इशारा, तरीही महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, मालक स्वत: स्वागताला
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं, नेमकं काय काय म्हणाले?
भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं, नेमकं काय काय म्हणाले?
Arvind Sawant News: जगेन-मरेन तर ठाकरेंसोबत, उभा चिरला तरी निष्ठा सोडणार नाही, अरविंद सावंतांनी पेपरवर लिहून निष्ठा दाखवली!
Arvind Sawant News: जगेन-मरेन तर ठाकरेंसोबत, उभा चिरला तरी निष्ठा सोडणार नाही, अरविंद सावंतांनी पेपरवर लिहून निष्ठा दाखवली!

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
Embed widget