ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2026 | गुरुवार
1. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, चंद्रपूरसह विधान परिषदेच्या 17 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडीची माघार, तर महायुतीच्या 5 जागा बिनविरोध, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पॉलिटिकल ड्रामा https://tinyurl.com/ypbsm3zk
2. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, ठाकरेंचे विधान परिषदेचे उमेदवार बाळ माने भाजपच्या गळाला, बाळ मानेंनी नितेश राणेंसोबत जाऊन अर्ज मागे घेतला https://tinyurl.com/5xzmy5zd ऐनवेळी माघार घेतलेल्याबाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी, तर कोट्यवधी रुपये घेऊन बाळ माने मॅनेज झाले, विनायक राऊतांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/ymthhrde
3. शिवसेनेसह भाजपच्या बड्या नेत्यांचे अतोनात प्रयत्न, पण भाजपच्या गोकुळ गीतेंनी शेवटपर्यंत माघार घेतलीच नाही, नाशिकमध्ये शेवटच्या दिवशी हायहोल्टेज ड्रामा, शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध अपक्ष गोकुळ गीते यांच्यामध्ये लढत होणार https://tinyurl.com/yk72ydet शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंच्या मुलाने आमचा बाप काढला, त्यामुळेच गोकुळ गीतेंनी माघार घेतली नसावी, गणेश गीतेंची माहिती https://tinyurl.com/bdft9864
4. ठाकरे गटाला आधीच कुणकुण, अखेरच्या क्षणी डाव पलटला, छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोनगावकरांची ऐनवेळी माघार, पण गणेश लोखंडेंच्या अपक्ष अर्जामुळे इज्जत राखली, संख्याबळानुसार भाजपच्या सुहास शिरसाटांचा विजय निश्चित https://tinyurl.com/4a98pwmm उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपकडून दबाव, कारखाना समिती बरखास्त करण्याची नोटीस पाठवली, देवयानी डोनगावकरांचे पती कृष्णा डोनगावरकरांचा आरोप https://tinyurl.com/ydusctpk
5. सुनील टिंगरेंनंतर शरद पवारांच्या श्रीकांत पाटलांचीही उमेदवारी मागे, राष्ट्रवादीच्या विक्रम काकडेंची पुणे विधान परिषदेवर बिनविरोध निवड https://tinyurl.com/44sb3pwh शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला, श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/yy3jjujp
6. गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातलं जात आहे, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/uw3z9at7
7. कार, फ्लॅट अन् सोन्याच्या अंगठीसाठी सुनेचा छळ, पुण्यात 25 वर्षीय नवविवाहितेनं जीवन संपवलं, पतीसह सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/zzvt2sxu पैशाच्या व्यवहारावरून वाद, परळीतील तरुणाला मित्रांनीच संपवलं अन् रेल्वे रुळावर फेकलं; 48 तासांमध्ये पोलिसांकडून छडा https://tinyurl.com/487h9xde
8. स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात, 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं, रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ https://tinyurl.com/3f3maest ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी पाच हजारांची लाच घेतली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात https://tinyurl.com/3z2feucc
9. केरळमध्ये मान्सूनचं आगमन, पुढच्या 48 तासांमध्ये कोकण किनारपट्टीवर पावसाची बरसात होण्याची शक्यता, विदर्भात मान्सूनसाठी 15 जून पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार, हवामान खात्याचा अंदाज https://tinyurl.com/3x5u928f
10. दुखापतीमुळे विराट कोहली 13 जून पासून होणाऱ्या अफगाणिस्तान दौऱ्यातून बाहेर, तर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला संधी https://tinyurl.com/4txymdm2 टीम इंडियाला मिळणार नवा टी-20 कर्णधार, श्रेयस अय्यरचं नाव जवळपास निश्चित, तिलक-ईशान उपकर्णधारपदाचे दावेदार https://tinyurl.com/mss9duxd
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
