Abhijeet Dipke: सायन्सची जी बुक असते ती मोठी असते, मॅथ्सची जी बुक असते ती पण मोठी असते, पण सिव्हिक्स बुक ज्याच्यात एक नागरिक कसा बनायचा देशाचं ते पुस्तक सगळ्यात छोटं असतं. मुलभूत जबाबदारी काय आहेत याबाबत पब्लिकला अजून थोडी जाणीव नाही. आपल्या व्होटिंगमध्ये सगळा घोळ होत आहे, माहितीच नाही व्होट कशासाठी करायचं. कोणीही येतो म्हणतो धर्म धोक्यात आहे, द्या व्होट. कोणीही येतो म्हणतो तुमची जात धोक्यात, द्या व्होट, त्याच्याने तुमच्या आयुष्यात काय बदललं? तुम्हाला चांगलं शिक्षण भेटणार आहे का? तुमच्या घरापुढचा रस्ता चांगला होणार आहे का? तुमचे पेपर लीक थांबणार आहेत का? आपल्यालाही बदलावं लागेल, असे काॅकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं. दिपके यांनी आज रोहित पवार यांच्या पुण्यातील विद्यार्थ्यांसोबतच्या आंदोलनाला भेट दिली.
फडणवीस साहेबांनी तर त्यांच्या मित्रांना अध्यक्षपदावर बसवलं
दिपके यांनी सांगितले की, एवढ्या सगळ्या स्टुडंट्सचं फ्युचर स्टेकवर आहे, एवढ्या सगळ्या मुलांचा भविष्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यात काही चुकी होती तर राजीनामा पण द्यायचा नाही?तुम्हाला कशासाठी बसवलं तिथं? मग नुसते हेलिकॉप्टरने फिरायला बसवलं आहे? नुसता आमचा टॅक्सचा पैसा खायला बसवला आहे? अशी विचारणा त्यांनी केली. आता फडणवीस साहेबांनी तर त्यांच्या मित्रांना अध्यक्षपदावर बसवलं. काय क्वालिफिकेशन होतं? फ्रेंड? नाही, फ्रेंड्स विथ बेनिफिट असा टोला त्यांनी लगावला. या फ्रेंड्स विथ बेनिफिटचा फडणवीस साहेबांना किती पर्सन कट भेटला? 50 खोके? यातूनच आमदार आणि खासदार विकले घेतले जात आहेत का मग? कुठून येतोय पैसा? जेव्हा लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे होते, तेव्हा तुम्ही काय केलं? दुसऱ्यांचे फंड मारले, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्र विकला, सगळं गुजरातला नेऊन ठेवलं. आमचे धंदे कशाला गुजरातला नेतात? तुम्ही स्वतः गुजरातला जाऊन बसा ना? आमच्या इंडस्ट्री कशाला नेऊन ठेवताय तिथे? असा हल्लाबोल त्यांनी केला.
अभिजित दिपके म्हणाले, आपल्याला अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, पण आता दुर्दैव असं म्हणायचं की आपल्यालाच त्या अधिकारांची कदर नव्हती. त्यांनी आपल्याला तेव्हा ते अधिकार दिले जेव्हा आपल्याला अधिकार काय असतात हेही माहिती नव्हतं. आपण आपल्या फंडामेंटल राईट्सला घेऊन थोडे सेन्सिटिव्ह नाहीये, का? कारण की आयतं भेटलंय ना! संघर्ष नाही करावा लागला, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
