Abhijeet Dipke on RSS Atul Limaye: दिल्लीच्या जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलनाकडे केवळ भाजपविरोधी (BJP) आंदोलन म्हणून न पाहता त्यामधील अराजकतेचे व्याकरण समजून घ्यायला पाहिजे.  हे आंदोलन फक्त भाजपविरोधी नव्हे तर देशविरोधी आणि लोकशाहीविरोधी असल्याचे वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर-सहकार्यवाह अतुल लिमये (Atul Limaye) यांना कॉकरोच जनता पार्टी संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी फटकारले आहे. ज्या लोकांनी गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा आयुष्यभर विरोध केला, त्यांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये, असे प्रत्युत्तर अभिजीत दिपके यांनी दिले. ते मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Continues below advertisement

सरसंघचालक मोहन भागवत हे 6 ऑगस्टला मुंबईत 'जनरेशन झी' (Gen Z) आणि 'जनरेशन अल्फा' (Gen Alpha) च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यावरही अभिजीत दिपके यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जेन झी सोबत बोलावं लागेल हे समजलं,  ही चांगली गोष्ट आहे. पण तरुण लोकांनी तरुणांसोबत बोलणं  जास्त चांगलं होईल. तुम्ही जोपर्यंत तरुण चेहरे पुढे आणणार नाहीत, तोपर्यंत  त्याला फार अर्थ नाही. तुम्ही तरुणांशी बोला, त्याला हरकत नाही. पण नवीन चेहरे आणि नवीन लोकांना विशेष करुन शिकलेल्या लोकांना पुढे आणलं तर अधिक चांगले होईल, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले. 

अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगरमधील कॉकरोच जनता पार्टीच्या बैठकीबाबतही भाष्य केले. ही बैठक दोन दिवस चालेल. या बैठकीला आमचे प्रवक्ते आणि आणखी काही लोक उपस्थित असतील. या बैठकीत जंतर मंतरच्या आंदोलनातून काय शिकलो, पुढे काय करता येईल, यावर विचार केला जाईल. तसेच कॉकरोच जनता पार्टी ही संघटना कशी वाढवायची आणि पुढील रोडमॅपबाबत चर्चा होईल, असे दिपके यांनी सांगितले.

Continues below advertisement

Atul Limye RSS : सर-सहकार्यवाह अतुल लिमये  नेमकं काय-काय म्हणाले?

सीजेपीच्या आंदोलनाचे एक केस स्टडी म्हणून अभ्यास करण्याची आणि ते डिकोड करण्याची गरज आहे. या आंदोलनाची क्रोनोलॉजी काय, मेथोडोलॉजी, सपोर्ट सिस्टीम काय आणि त्या पाठीमागची विचारधारा कोणती हे समजण्याची गरज आहे. अभिजीत दिपके च्या भारत आगमनाला आणि त्यानंतर झालेल्या दिल्ली सह इतर शहरातील आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 20 जून नंतर सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाला टप्प्याटप्प्याने वाढता प्रतिसाद मिळाला. या काळात (दिपके च्या आगमनापासून 20 जून पर्यंत) असं काय झालं असावं की या आंदोलनाचा स्वरूप बदलला? कोणती सपोर्ट सिस्टीम दीपकेच्या आंदोलनासोबत जोडली गेली हे शोधण्याची गरज असल्याचे मत अतुल लिमये यांनी व्यक्त केले होते

जोडल्या गेलेल्या सपोर्ट सिस्टीम मध्ये अनेक डाव्या संघटना होत्या.(Atul Limye) त्या संघटनांची नावे तपासली तर या व्यासपीठावरून हिंदू विरोध का झाला, 'भारत तेरे तुकडे होंगे' अशी घोषणा देणारे लोक या व्यासपीठावर का आले, या व्यासपीठाचा ताबा डाव्या संघटनांनी कसा घेतला, विद्यार्थ्यांचा आंदोलन राजकीय आंदोलन कसा रूपांतरित झाला, हे आपल्या लक्षात येतं. या आंदोलनाला समजून घेण्यासाठी योगेंद्र यादवांचा वाक्य लक्षात घ्या, योगेंद्र यादव म्हणाले की यापुढे या देशात लोकशाहीचा भवितव्य संसद नाही, तर रस्त्यांवर निर्धारित केलं जाईल, लोकशाहीची दिशा निवडणूकातून नाही, तर विरोधातून निश्चित होईल. योगेंद्र यादव च्या याच वाक्याला डी कोड करण्याची गरज आहे असेही अतुल लिमये म्हणाले. विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य कारणासाठी सुरू झाले होते, मात्र ते का भरकटले आणि ते डाव्या संघटनांच्या नियंत्रणात का गेले हे आपल्याला समजून येते.(Atul Limye) मुळात डाव्या संघटनांची "पर्यायी राजकारण" या नावाने एक संकल्पना आहे, बीजेपीच्या आंदोलनाच्या माध्यमातून डाव्या संघटनांनी त्याच संकल्पनेचा यशस्वी प्रयोग केल्याचे अतुल लिमये म्हणाले होते.

आणखी वाचा

Mohan Bhagwat : संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार