Abhijeet Dipke on Gyanesh Kumar: कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनाम्यासाठी शेवटचा अल्टीमेटम दिला आहे. जर ज्ञानेश कुमार यांनी उद्यापर्यंत (26 सप्टेंबर) राजीनामा दिला नाही, तर 2 ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिला आहे. या आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होईल, अशी घोषणा दिपके यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. सीजेपीने ज्ञानेश कुमार यांना 48 तासांची मुदत दिली होती. एसआयआरच्या माध्यमातून देशातील 13 कोटींहून अधिक मते वगळण्यात आल्याचे सीजेपीने म्हटलं होतं. ज्यामुळे लोकांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले. 

Continues below advertisement

Continues below advertisement

मुंबईतून देशव्यापी आंदोलनास सुरुवात  

अभिजित दिपके यांनी ट्विटमधून घोषणा केली आहे की, जर ज्ञानेश कुमार यांनी उद्यापर्यंत राजीनामा दिला नाही, तर सीजेपी 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतून देशव्यापी आंदोलनास सुरुवात करेल आणि ते आंदोलन भारतातील विविध शहरांपर्यंत नेईल. या गांधी जयंतीनिमित्त, आपण लोकशाही वाचवण्याचा संकल्प करूया. दुसरीकडे, काँग्रेस देशभरात आंदोलने आयोजित करण्याची योजना आखत आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाविरोधात (एसआयआर) मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांमध्ये एसआयआरची घटनात्मक वैधता, प्रक्रिया आणि अंमलबजावणी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, दोन निवडणूक आयुक्तांचा आक्षेप असूनही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरशी संबंधित 14 आदेश जारी केले. त्यांनी हे आदेश रद्द करण्याची आणि दाखल केलेले आक्षेप जाहीर करण्याची मागणी केली आहे.

जम्मू आणि काश्मीर विधानसभेत काँग्रेस आमदारांचा एल्गार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज जम्मू आणि काश्मीर विधानसभेत गोंधळ उडाला. काँग्रेसचे आमदार 'ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा' असे लिहिलेले फलक घेऊन आले होते. दुसरीकडे, 'इंडियन एक्सप्रेस'मधील 23 सप्टेंबरच्या अहवालानंततर देशात निवडणूक आयोगातील बेबंदशाही समोर आली आहे. दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या 10 महिन्यांत एसआयआरवर किमान 14 लेखी आक्षेप नोंदवले आहेत. यापैकी चार आक्षेप एकाच दिवशी नोंदवण्यात आले होते. मात्र, आयोगाने म्हटले आहे की, असे आक्षेप सामान्य प्रक्रियेचा भाग आहेत आणि एसआयआरसह सर्व अंतिम निर्णय एकमताने घेतले जातात.

ज्ञानेश कुमार देशद्रोही, राहुल गांधींचा प्रहार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. राहुल म्हणाले की, "मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश यांनी मतांची चोरी केली आहे. ते देशद्रोही आहेत. मी त्यांच्या नियुक्तीला विरोध केला होता, पण सरकारने माझ्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष सहा महिन्यांत दुसऱ्यांदा निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला होता, परंतु तो लोकसभेत फेटाळण्यात आला होता.

महुआ यांची एफआयआरची मागणी

टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. महुआ यांचा आरोप आहे की, ज्ञानेश यांनी नियमांविरुद्ध मतदार यादीत बदल केले आणि पात्र मतदारांची नावे वगळली. 

इतर महत्वाच्या बातम्या