Cockroach Janta Party: सोनम वांगचुक (sonam wangchuk) हे कालही आमचे नेते, मार्गदर्शक होते, आजही आहे आणि भविष्यातही राहतील. आमचे सहकारी पहिल्या दिवसापासून झारखंडमधीलविद्यार्थ्यांच्या आंदोलनात सक्रिय आहेत. गरज पडल्यास आम्ही देखील त्या आंदोलनात सहभागी होऊ. या संदर्भात माझी फोनवर आणि व्हिडिओ कॉलवर चर्चा झाली. आंदोलन बळकट करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी शक्य ते कार्य करेल. झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलकांच्या (Student Protest in Jharkhand) ज्या काही मागण्या आहे, त्याला आम्ही पूर्णपणे सहकार्य करत असल्याची प्रतिक्रिया कॉक्रोज जनता पार्टीचे (Cockroach Janta Party) सर्वेसर्वा अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी दिली. गरज पडल्यास आम्ही देखील मैदानात उतरून लढा अधिकबळकटकरूनताकद देऊ, असेही ते म्हणाले. छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित सीजेपीच्या बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (Abhijeet Dipke reaction on Student Protest in Jharkhand) 

Continues below advertisement

झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाबद्दल दीपके काय म्हणाले? (Abhijeet Dipke on Student Protest in Jharkhand)

अभिजीत दीपके यांनी झारखंड आणि इतर राज्यांमधील विद्यार्थी आंदोलनांना पाठिंबा दिला. ते म्हणाले, "आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना तंबू आणि शौचालये यांसारख्या मूलभूत सुविधा नाकारणे चुकीचे आहे आणि त्यांच्या मागण्या रास्त आहेत." ते असेही म्हणाले की, प्रत्येक गरीब आणि गरजू मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, हे सुनिश्चित करणे हे देशाचे मुख्य लक्ष असले पाहिजे.

Continues below advertisement

देशातील मीडिया असो किंवा निवडणूक आयोग असो, यांवरून जनतेचा पूर्णतः विश्वास उडालेला आहे. आम्हाला जाऊ सहकार्य मिळालं ते केवळ शिक्षणाच्या मुद्द्यावरून नाही तर इतरत्रही विषय महत्त्वाचे होते. म्हणूनच आमच्या आंदोलना जंतर मंतरसह चेन्नई मुंबई पश्चिम बंगाल आणि देशात इतरत्रही तो विश्वास मिळत होता. या संविधानिक संस्थेंवरचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी एक लोक चळवळ महत्त्वाची आहे. राजकीय पक्षांनी ही परिस्थिती सुधारली पाहिजे. सत्य ते लोक विरोधात जातात मात्र परिस्थिती तशीच राहते. आम्हाला जनतेचा सहभाग आणि सहकार्य त्यामुळेच लागले की आम्ही राजकीय पक्ष विचारधारा आणि इतर गोष्टी सोडून लोकांच्या न्याय हक्कासाठी एकत्र जमलो. लोकशाहीला कमजोर करण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी लोक एकत्र जमले होते. असेही अभिजित दिपके म्हणाले.

Student Protest in Jharkhand: पिण्याचे पाणी, अन्न आणि शौचालयाच्या सुविधांसारख्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवण्यात आले

झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) परीक्षेत कथित अनियमितता झाल्याच्या कारणावरून झारखंडमध्ये विद्यार्थ्यांची आंदोलने तीव्र झाली आहेत. हजारो परीक्षार्थी गेल्या 12 दिवसांपासून रांची येथील जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर बेमुदत आंदोलन करत आहेत. JPSC परीक्षेतील कथित अनियमिततेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या तरुण परीक्षार्थींच्या संतापाचे आणि व्यथेचे प्रतीक रांचीमधील जयपाल सिंग मुंडा स्टेडियम बनले आहे. मात्र, आंदोलकांचा असा दावा आहे की, कडक उन्हाचा आणिपावसाचा सामना करत आंदोलनस्थळी ठाण मांडूनही त्यांना पिण्याचे पाणी, अन्न आणि शौचालयाच्या सुविधांसारख्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

Saurav Das : काही लोकांनी शिवीगाळ केली, ही गोष्ट चुकीची; त्याचं आम्ही समर्थन करणार नाही

ज्यांच्यावर लाठीचार्ज झाला, जे लोक जखमी झाले, डोकं फोडण्यात आली, अशा विद्यार्थ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सहकार्य करत आहोत त्यांना कायदेशीर मदत पुरवत आहोत. आमची सरकारशी देखील चर्चा सुरू आहे. केवळ दिल्लीच नावे तर देशभरात जे आंदोलन झाली त्यातील सर्व विद्यार्थ्यांना आम्ही मदत पुरवत आहोत. याचा परिणाम आपल्याला दिसत असेल की बऱ्याच राज्यातून गुन्हे मागे घेतल्या जात आहेत. काही लोकांनी शिवीगाळ केली ही गोष्ट चुकीची आहे. त्याचं आम्ही समर्थन करणार नाही अशी प्रतिक्रिया सीजेपीचे प्रवक्त्ये सौरव दास यांनीदिली.

Jharkhand: रांचीमधील जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर 12 दिवसांपासून विद्यार्थ्यांचाएल्गार; JPSC परीक्षेतील कथित अनियमिततेविरुद्ध आंदोलन

संरक्षण राज्यमंत्री आणि रांचीचे खासदार संजय सेठ यांनी या मुद्द्यावर गप्प राहिल्याबद्दल विरोधी पक्षांवर टीका केली आहे. राज्य सरकारने पूर्णपणे असंवेदनशीलता दाखवली असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, आतापर्यंत सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतलेली नाही. आंदोलनस्थळी मूलभूत सुविधांचा अभाव कायम असतानाच, गोड्डाचे खासदार निशिकांत दुबे यांनीही हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. परीक्षेतील जागांची विक्री झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, सरकारच्या भरती प्रक्रियेच्या हाताळणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची दुरवस्था ही राज्य सरकारच्या असंवेदनशीलतेचे प्रतिबिंब असल्याचे सांगत, माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, तरुणांच्या हक्कांसाठीचा हा लढा केवळ रांचीपुरता मर्यादित राहणार नाही.

इतर महत्वाच्या बातम्या