एक्स्प्लोर

Abhijeet Dipke: श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा

आंदोलन आपण मोठं करू, मात्र तुम्ही उपोषण सोडा, आंदोलन सुरू ठेवा असे आवाहन दिपके यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना केले. 

Abhijeet Dipke on Adiwasi Student: "श्रीमंतांची पाळीव कुत्री एसीत असतात, पण राज्याच्या आदिवासी आश्रमशाळांमधील शौचालयांची अवस्था अशी झाली आहे की तिथे जनावरंही पाय ठेवणार नाहीत. मग सरकारकडून आदिवासींच्या नावाने मंजूर होणारा कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका मुरतो कुठे? आदिवासींची निष्पाप मुलं उपाशी झोपत असताना कोणाची पोटं भरली जात आहेत?" असा थेट सवाल काॅकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी उपस्थित केला. आश्रमशाळांच्या भीषण वास्तवावरून दिपके यांनी राज्य सरकार, संबंधित आदिवासी विकास मंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार तोफ डागली. आंदोलन आपण मोठं करू, मात्र तुम्ही उपोषण सोडा, आंदोलन सुरू ठेवा असे आवाहन दिपके यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना केले. 

मंत्र्यांचा राजीनामा मुबंईमध्ये जाऊन मागा, तिथून त्यांना आपला आवाज ऐकू जाईल, आपल्याला आपले अधिकार विसरायचे नाहीत. डॉ. आंबेडकर यांनी आपल्याला अधिकार दिले ते आपल्याला वापरायचे आहेत, त्यासाठी लढायचं आहे. तुमच्या प्रत्येक मुद्याला आमचे समर्थन आहे, पण उपोषण मागे घ्या, आंदोलन मोठं करू. मुबंईमध्ये आदिवासी मुलांचा आवाज उठला पाहिजे, मुबंईमध्ये आदिवासी आवाज गाजला पाहिजे, असे आवाहन दिपके यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी माझ्या सोबत यावं, कोणत्या झेडपी शाळेत रांगा लागल्या दाखवावे. मुख्यमंत्र्यांची लेकरं कोणत्या झेडपी शाळेत शिकले, झेडपी शाळेत का शिकले नाही? अशी विचारणा त्यांनी केली. 

तर असेच हसला असता का?

गेल्या 12 दिवसांपासून आश्रमशाळांच्या दुरवस्थेविरोधात आणि मूलभूत सुविधांच्या हक्कासाठी आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. मात्र, या उपोषणाला भेट द्यायला आलेले आदिवासी विकास मंत्री हसत हसत निघून गेल्याचा आरोप दिपके यांनी केला. मंत्र्यांच्या या असंवेदनशील वागणुकीवर संताप व्यक्त करत दिपके म्हणाले, "मंत्र्यांच्या हसण्याचे हे कसले प्रकार? आज जर या मंत्र्यांच्या स्वतःच्या मुलाला आश्रमशाळेत सर्पदंश झाला असता, तर ते असेच हसत बसले असते का? गरिबांची, आदिवासींची पोरं तुम्हाला माणसंच वाटत नाहीत का? ही मुलं तुमच्या घरातली नाहीत म्हणून त्यांच्या जीवाशी असा जीवघेणा खेळ चालवला आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी केला.

'हे अन्न तुम्ही खाऊन दाखवणार का?'

उपोषणाच्या ठिकाणी अभिजित दिपके यांनी आदिवासी विकास विभागाचे वाभाडे काढले. आश्रमशाळेत ज्या दर्जाचं अन्न दिलं जातं, ते दाखवत "मंत्र्यांनी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी हे अन्न स्वतःच्या तोंडात घालून दाखवावं, हे जेवण तुम्ही कधी खाल्लं असतं का?" असा थेट सवाल त्यांनी विचारला. या खात्याला मिळणाऱ्या कोट्यवधींच्या बजेटमधून नेमकी कोणाची पोटं भरली जात आहेत? याचं उत्तर आता आदिवासी मंत्र्यांनी द्यावं, नाहीतर थेट मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.

'एकदा या आणि वास्तव बघा'

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 75 टक्के सरकारी शाळा चांगल्या असून केवळ 25 टक्के शाळांमध्ये अडचणी असल्याचा दावा केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेत दिपकेंनी त्यांना थेट आव्हान दिलं आहे. "मुख्यमंत्र्यांचा हा दावा जर खरा असेल, तर मी स्वतः त्यांना या आश्रमशाळांमध्ये येण्याचं आमंत्रण देतो, असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget