एक्स्प्लोर

Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला

Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारत दिल्लीच्या जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली होती. हे आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.

Abhijeet Dipke: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात  आंदोलनासाठी दिल्लीत गेलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांच्या आजीचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिजीत दिपके शनिवारी सकाळी आंदोलनासाठी दिल्लीत गेले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांचे विमान धावपट्टीवर उतरताच त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले. यानंतर अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांना केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कृतीविरोधात आगपाखड केली होती. त्यांनी काहीवेळापूर्वीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या मुलाची पाठराखण केली होती. मात्र, यानंतर काहीवेळातच अभिजीत दिपके यांच्या वडिलांच्या आईचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हिंगोलीतील संतूक पिंपरी या मूळगावी अभिजीत दिपके यांच्या आजीचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे आता अभिजीत दिपके यांना दिल्लीतील आंदोलन सोडून महाराष्ट्रात परत यावे लागण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीने पुकारलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आहे.  सावित्रीबाई शंकर दिपके असे त्यांचे नाव होते. त्या 85 वर्षांच्या होत्या.  अभिजीत दिपके निर्णायक लढ्यासाठी दिल्लीत असताना अभिजीत यांच्या आजीचं निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Delhi Protest news)

गेल्या काही महिन्यांपासून अभिजीत दिपके यांची आजी आजारी होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. थोड्याचवेळात अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांसह इतर कुटुंबीय त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हिंगोलीतील संतूक पिंपरीच्या दिशेने रवाना होणार आहेत. मात्र, आता अभिजीत दिपके काय करतात, हे बघावे लागेल. त्यांना महाराष्ट्रात परत यायचे झाल्यास दिल्ली पोलीस त्यांना सोडणार का, हे बघावे लागेल.

Abhijeet Dipke Family : संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय, अभिजीत दिपकेंचे आई-वडील संतापले

अभिजीत दिपके यांना दिल्लीत पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांना नाराजी व्यक्त केली. वडील भगवान दिपके म्हणाले की, इतके पोलीस दिल्लीमध्ये आणलेत कशा मला हेच कळत नाही की, विद्यार्थ्यांच साधं प्रदर्शन आहे. इथे काय चंबलच्या खोऱ्यामध्ये डाकू जमा झालेत का? डाकू जमा झालेत का दिल्लीमध्ये? डाकू तर पूर्ण संसदेमध्ये बसलेले आहेत. एवढं विद्यार्थ्यांच्या प्रोटेस्टसाठी एवढं हे काय करतात? पोलीस फोर्स का लावायची गरज आहे?, असा सवाल दिपके यांच्या वडिलांनी उपस्थित केला. तर दिपकेंच्या आईनेही केंद्र सरकारवर टीका केली. मी बातमी पाहिली पोलिसांनी तिघांना विमानातूनच ताब्यात घेतलं, सरकारने ते चुकीचं केलं ना, विमानातून ताब्यात घेतलं, एवढं काय या पोरांनी त्यांच वाईट केलं होतं, त्यांना विमानातून ताब्यात घ्यायला, तुम्ही बलात्काराच्या घरी का नाही जात, मग त्यांच्या घरी जाऊन तुम्ही अटक करता का? करत नाही ना,  मग याच यांना काय एवढं वाईट केलं होत या पोरांनी त्यांना प्लेनमध्ये जाऊन अटक करायचं काहीच गरज नव्हती, असे दिपकेंच्या आईने म्हटले. 



आणखी वाचा

Abhijeet Dipke deatin Delhi Police: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड होताच हायव्होल्टेज ड्रामा! महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं, विमानात गेल्या अन् अभिजीत दिपकेंना म्हणाल्या...

 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC News: महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
Nala Sopara Chhath Puja : नालासोपाऱ्यात छठपूजेवरून तणाव; संतप्त महिलांनी नियम डावलून तलावाच्या प्रवेशद्वाराचं कुलूप तोडलं, अन्.....
नालासोपाऱ्यात छठपूजेवरून तणाव; संतप्त महिलांनी नियम डावलून तलावाच्या प्रवेशद्वाराचं कुलूप तोडलं, अन्.....
Mahendra Dalvi on Sunil Tatkare: सुनील तटकरेंना राष्ट्रवादीत कोणी विचारत नाही, येत्या काही दिवसात त्यांची निश्चित हकालपट्टी; महेंद्र दळवींची घणाघाती टीका
सुनील तटकरेंना राष्ट्रवादीत कोणी विचारत नाही, येत्या काही दिवसात त्यांची निश्चित हकालपट्टी; महेंद्र दळवींची घणाघाती टीका
Gadchiroli News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रात्री गडचिरोलीत मुक्काम; देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा आज ऐतिहासिक सोहळा, पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रात्री गडचिरोलीत मुक्काम; देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा आज ऐतिहासिक सोहळा, पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC News: महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
Embed widget