नवी दिल्ली : जंतरमंतर येथे झालेले कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला परदेशातून फंडिग करण्यात येत असल्याचा आरोप (Foreign Funding Allegation) सातत्याने केला जात आहे. यावरच सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री असताना जर परदेशातून पैसा येत असेल तर मग हे कसले चाणक्य? असा टोला दिपकेंनी लगावला. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधानावर बोलूच नये, असंही दिपके म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात अभिजीत दिपके यांनी सीजेपीची स्थापना, जंतरमंतरवरील आंदोलन आणि राजकारण यासह अनेक विषयांवर चर्चा केली. 

Continues below advertisement

सीजेपीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर या आंदोलनासाठी परदेशातून फंडिग होत असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्याचवेळी अभिजीत दिपकेंचे आंदोलन हे देशविरोधी आणि संविधान विरोधात आहे. त्याकडे एक केस स्टडी म्हणून पाहिलं पाहिजे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. त्याला आता अभिजीत दिपके यांनी प्रत्युत्तर दिलं. 

Abhijeet Dipke On Amit Shah : अमित शाह कसले चाणक्य? 

आमच्या आंदोलनाला परदेशातून पैसे येतात असा आरोप होत आहे. अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री असताना जर असं होत असेल तर ते कसले चाणक्य? असा टोला अभिजीत दिपके यांनी लगावला. तसेच आमचे आंदोलन हे जर देशविरोधी आहे असं म्हणत असतील तर मग केंद्र सरकार देशविरोधी लोकांसोबत का चर्चा करत होते? जेपी नड्डा हे देशविरोधी लोकांसोबत चर्चा करत होते का? आम्ही देशविरोधी असतो तर सरकार आमचं का ऐकत होतं? संविधान विरोधी लोकांचं ऐकून सरकारने शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला का?

Continues below advertisement

नीट पेपरफुटीबद्दल अमित शाह सभागृहात काहीच बोलत नाहीत, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्यावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके म्हणाले की, "अमित शाह हे आता आणखी कोणत्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करायचा, एके 47 आणि पेलेट गन वापरायची हे विचार करत असतील. आणि तो विचार जर करत नसतील तर कोणते आमदार फोडायचे, कोणते खासदार फोडायचे याचा विचार करत असतील. त्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत."

Cockroach Janata Party : आप पक्षाची साथ का सोडली? 

अभिजीत दिपके यांनी आप पक्षासोबत जोडले गेल्यापासून त्यांची साथ का सोडली याची माहिती दिली. ते म्हणाले की, "दिल्लीत अण्णा हजारेंचे आंदोलन सुरू असताना मी पुण्यात शिकायला होतो. त्यावेळी आप पक्षाकडून शिक्षण आणि आरोग्याच्या मुद्द्यांवर लढा सुरू झाला. ते मला आवडलं. त्यावेळी इंटर्नशिपची संधी मिळाली आणि त्यांच्यासोबत जोडलो गेलो. नंतरच्या काळात त्यामध्ये जास्त पैसे मिळत नसल्याने माझे घर चालू शकत नव्हते. त्यामुळे जास्त पैसे कमावण्यासाठी आपण त्यांची साथ सोडली."

ही बातमी वाचा: