Abdul Sattar at Shiva Mandir controversy: शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला. अब्दुल सत्तार मंदिरातून गेल्यानंतर काही तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडून मंदिराचे शुद्धीकरण केल्याचं समोर आलं. नंतर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. सत्तारांच्या महादेव मंदिर प्रवेशामुळे वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. भाजपचा विरोध करत मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं.  या मंदिर प्रवेशावरून आता राजकारण सुरू झालं आहे.

Continues below advertisement

शिवसेना उबठा गटाकडून सत्तार यांची पाठराखण

 सिल्लोड तालुक्यतील आमदार अब्दूल सत्तार यांनी रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिरात महाशिवरात्र निमित्ताने सत्तार यांनी  दर्शन घेतलं. त्यावर गावातील काही तरुणांनी आक्षेप घेतला .सत्तार धर्माने मुस्लिम आहेत, त्यावर ते गोमांस खातात..त्याने मंदिरच अपवित्र झाल्याचं दावा त्यानी केला. गावातील तरुण यावरच थांबले नाहीत तर मंदिरात गोमूत्र शिंपडत  मंदिर पवित्र केल्याचा दावा ही केला... भाजप कार्यकर्त्यांनी त्या मंदिरात गोमूत्र शिंपडले अशी माहिती सिल्लोड भाजपचे शहर अध्यक्ष मनोज मोरेलू यांनी दिली.... या मंदिर प्रवेशावर आता राजकारण सुरू झालं आहे .. अब्दुल सत्तारांनी हिंदु धर्म स्वीकारला आहे का ? नसेल तर मग त्यांनी बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होते अशी टीका भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले  यांनी केलीय..

अंबादास दानवे यांची सडकून टीका 

उबठा नेते अंबादास दानवे यांनी भोसले यांच्या विधानावर सडकून टीका केली आहे. टे म्हणाले" मंदिर असो मशीद असो हे सर्व सार्वजनिक ठिकाण आहे, तुषार कोण शंकराचार्य लागून गेला का हरामखोर तो सांगणारा. एखादा मुस्लिम माणूस मंदिरातून दर्शन करत असेल तर त्याचा स्वागत करावं त्याला का विरोध करावा. भारतीय जनता पार्टी धर्माला संकुचित बनवत आहे हिंदू धर्म हा व्यापक आहे." असे अंबादास म्हणाले...

Continues below advertisement

या वादावर आमदार अब्दुल सत्तार यांचे समर्थकही तुटून पडले आहेत.  सत्तार यांनी मंदिराला दोन कोटींची देणगी दिली होती. ते काम तेवढ्यात पूर्ण झाले नाही म्हणून काही लोकांनी पाहणी करायला  बोलावलं होतं, म्हणून सत्तार गेले होते असे त्यांनी सांगितलय. मात्र, काही संकुचित बुद्धीचे लोक यावर राजकारण करत असल्याचं सत्तार समर्थकांचा म्हणणं आहे... गावाचं नाव रहिमाबाद. त्यागावत महादेवाचे मंदिर आहे . आता याच मंदिरात सत्तार यांच्या प्रवेशावरून नव राजकारण सुरू झालंय.. मंदिरात कोणी जावं न जावं हा श्रद्धेचा भाग आहे. राजकारणासाठी देवदेवतांचा वापर होऊ नये अशा नागरिकांच्या भावना आहेत.