एक्स्प्लोर

Abdul Sattar On Eknath Shinde And Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी चर्चा करावी; अब्दुल सत्तारांचं बेधडक विधान, ठाण्यातील बैठकीनंतर काय काय म्हणाले?

Abdul Sattar On Eknath Shinde And Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर आज अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाशी बोलताना पुन्हा एकदा आपल्या मनातली खदखद व्यक्त केली.

Abdul Sattar On Eknath Shinde And Uddhav Thackeray: ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. तसंच शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना महायुतीचे नियम पाळण्याच्या सूचना दिल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. सत्तारांच्या नाराजीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत बैठक होणार असल्याचंही शिंदे म्हणालेत. तर एकनाथ शिंदे जे बोलतील तो अंतिम शब्द असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. 

मोठ्या भावाकडून आमचा पक्ष संपवू पाहत आहे. जिल्ह्यात आमच्याबाबत अनेक घडामोडी घडत आहेत, निधी मिळत नाही आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचं काय होईल हाही प्रश्न आहे. सोबत येऊन जर का अशी वागणूक मिळत असेल तर पश्चातापाच्या गोष्टी मनात येतात. नाराजी होती, म्हणून हे पाऊल उचलले. 2029 पर्यंत आमच्या नेत्यांनी वेळीच या गोष्टीची दखल घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याची दखल घेतलेली आहे. पक्षातही काही नाराजी होती, त्यावरही सूचना शिंदेंनी दिल्या आहेत, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

विधान परिषद निवडणूक महायुतीम्हणून लढायची आहे, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्याचं पालन मी करीन, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली. एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर आज अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाशी बोलताना पुन्हा एकदा आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. काम करताना मित्रपक्षाकडून ज्या प्रकारच्या अडीअडचणी येतात, त्यासंदर्भात एकनाथ शिंदेंसोबत सविस्तर चर्चा झाली. आम्हाला वरिष्ठांकडून काही त्रास नाही, मात्र स्थानिक नेत्यांकडून आमची अडवणूक केली जाते आहे. हा त्रास बंद व्हावा, आम्हाला कुठेकुठे काय त्रास होतो हे सगळं सांगितलं, असं अब्दुल सत्तार म्हणाले. 

एकनाथ शिंदेंचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य- अब्दुल सत्तार (Abdul Sattar On Eknath Shinde And Uddhav Thackeray)

छत्रपती संभाजीनगरात आमचे सहा आमदार, एक खासदार आहे. त्यांचे तीनच आमदार आहेत. तरी आम्ही सत्तेमध्ये त्यांना (भाजपला) वरची बाजू दिली, कारण महायुतीचा धर्म पाळतोय. आत्तापासून जर भाजप असं वागत असेल तर 2029 च्या निवडणुकांमध्ये युती राहणार का? यासंदर्भात चर्चा करावी लागेल, असं मोठं विधानही अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं. आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. त्यांच्या सांगण्यानूसार आम्ही बाहेर पडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आमचे योग्य कामं बघून भाजपने त्याचंही मूल्यमापन करावं, असं अब्दुल सत्तारांनी सांगितले. 

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी चर्चा करावी- अब्दुल सत्तार (Abdul Sattar On Eknath Shinde And Uddhav Thackeray)

दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात हे वक्तव्य मी नाही, तर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंनी केलं होतं. त्यावर मी देखील प्रतिक्रिया दिली. दोन्ही बाजूंच्या (उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे) पक्षप्रमुखांनी यासंदर्भात चर्चा करावी, असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलं. तसेच आमच्या पक्षातील साध्यात साधे बदल एकनाथ शिंदे करतील. आजच्या परिस्थितीमुळे आम्ही बेचैन आहोत. सध्या कुठल्याच निवडणुका नाहीत, मात्र या सगळ्या निवडणुकांमध्ये जे चित्र समोर आलं की, मोठा भाऊ लहान भावाकडून सगळी सत्ता काढून घेतोय, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम मित्रपक्ष करत- अब्दुल सत्तार (Abdul Sattar On Eknath Shinde And Uddhav Thackeray)

शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम मित्रपक्ष करत आहे. आमचा त्याग कामख्याला माहिती आहे, भाजप तो विसरली आहे. आमची ममता होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शिवसेनेचे दोन भाग केले. मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजेत, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं होतं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह छत्रपती संभाजीनगरमधील सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतलं होतं. 

संबंधित बातमी-

Sanjay Raut On Shivsena Merger: अब्दुल सत्तारांसह अंबादास दानवेंनीही सांगितलं, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; संजय राऊत म्हणाले, मातोश्रीवर...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Shivsena : शिंदेंना पाठिंबा देणारे ठाकरेंचे पाच खासदार फायनल, उशीरा दिल्लीत पोहोचणारा सहावा खासदार नेमका कोण? 
शिंदेंना पाठिंबा देणारे ठाकरेंचे पाच खासदार फायनल, उशीरा दिल्लीत पोहोचणारा सहावा खासदार नेमका कोण? 
खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अॅडव्हान्स, संजय राऊतांच्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी?
खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अॅडव्हान्स, संजय राऊतांच्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी?
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget