एक्स्प्लोर

Abdul Sattar : जिल्हा बँकेसाठी मुलाचा अर्ज बाद करण्यामागे काय राजकारण माहीत नाही, देवेंद्रजी योग्य तो न्याय करतील : अब्दुल सत्तार 

Abdul Sattar On DCC Bank Election : अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आता भाजप-शिवसेनेमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. 

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीच्या तयारीत असलेल्या आणि नंतर तलवार म्यान केलेल्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सुपुत्र समीर सत्तार यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Chhatrapati Sambhajinagar District Bank Election) अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. समीर सत्तार यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून अर्ज बाद करण्यामागे कोणतं राजकारण आहे हे सांगता येणार नाही, या बाबत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचं शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. अगदी क्षुल्लक कारणावरुन समीर सत्तार यांचा अर्ज बाद करण्यात आला असून आता देवेंद्रजी योग्य तो न्याय करतील असंही सत्तार म्हणाले.

Abdul Sattar On Politics : काय राजकारण माहीत नाही? 

समीर सत्तार यांचा अर्ज अगजी क्षुल्लक कारणावरून बाद करण्यात आलाचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. अब्दुल सत्तार म्हणाले की, प्रशासनाच्या मते आम्ही जिथून व्यवस्थापन करणार आहोत ती जागा आम्ही भाड्याने दिली आहे. मात्र मूळात नियम 58 मध्ये आम्ही सदस्यचं नसताना या अटी आम्हाला लागू होत नाहीत. आता हे अर्ज अवैध करण्यामागे कोणतं राजकारण आहे का हे आता सांगता येणार नाही.

समीर सत्तार यांच्या अर्ज बाद झाल्यानंतर अब्दुल सत्तार हे नाराज झाल्याचं दिसून आलं. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. शेवटी देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत, त्यांना सगळे नियम माहिती आहेत. त्यामुळे ते योग्य तो न्याय करतील, अशी अपेक्षा अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली. 

Sanjana Danve DCC Bank Election : संजना दानवे यांचाही अर्ज अवैध

अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांच्यासोबतच माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आमदार संजना जाधव यांचा अर्जही बाद करण्यात आला. अर्जांमध्ये किरकोळ चुका काढून हे अर्ज अवैध करण्यात आले आहेत असा आरोप आता शिवसेनेकडून केला जात आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता भाजप आणि शिवसेनेत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

जिल्हा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम 1 जून रोजी प्रसिद्ध झाला असून 8 जुलै रोजी त्यासाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच अर्ज विक्री आणि स्वीकारण्यास सुरुवात झाली होते. या निवडणुकीत संचालकपदासाठी शुक्रवारपर्यंत एकूण 214 उमेदवारांजे अर्ज दाखल झाले होते. त्यात, मंत्री, आमदार, खासदारांच्या मुलांसह दिग्गजांच्या अर्जाचा समावेश होता. मात्र, या दिग्गजांपैकी दोन दिग्गज नेत्यांचा धक्का बसला आहे. अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर अब्दुल सत्तार यांचा आणि कन्नडच्या शिवसेना आमदार संजना जाधव यांचा अर्ज बाद झाला आहे. 

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget