एक्स्प्लोर

Abdul Sattar at Shiv Mandir: अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले

Abdul Sattar at Shiv Mandir: अब्दुल सत्तार यांनी काल महाशिवरात्रीच्यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील एका देवळात जाऊन दर्शन घेतले होते. यावरुन वाद निर्माण झाला आहे.

Abdul Sattar at Shiv Mandir: शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. अब्दुल सत्तार हे मंदिरातून गेल्यानंतर काही तरुणांनी या मंदिरात गोमूत्र शिंपडून मंदिराचे शुद्धीकरण करण्याचा प्रकार केला. यावरुन उलटसुलट चर्चा सुरु असतानाच आता भाजपच्या (BJP) अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी अब्दुल सत्तार यांना लक्ष्य केले आहे. अब्दुल सत्तार हे हिंदू नाहीत. त्यामुळे त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेणे योग्य नाही. त्यांना इतकीच इच्छा असेल तर त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करुन मंदिरात यावे, असे तुषार भोसले यांनी म्हटले. ते सोमवारी वर्धा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

अब्दुल सत्तार यांनी हिंधू धर्मात प्रवेश केलाय का, हिंदू धर्म स्वीकारला आहे का? तसे नसेल त्यांनी गर्भगृहाच्या बाहेरुन दर्शन घ्यायला हवे होते. आमच्या देवी-देवतांचे मंदिरं ही काही स्मारकं नाहीत. गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात. राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे धार्मिक नियम मोडू नका. तुम्हाला खूपच इच्छा असेल तर मग हिंदू धर्म स्वीकारा आणि खुशाल आमच्या देवी-देवतांचे आशीर्वाद मिळवा, असे तुषार भोसले यांनी म्हटले.

राज्यभरात रविवारी महाशिवरात्रीचा (Mahashivratri) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगरमधील रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिरात  जाऊन शंकराचे दर्शन घेतले होते. अब्दुल सत्तार यांनी  मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिर अपवित्र झाल्याचे म्हणत काही तरुणांनी गोमूत्र शिंपडून मंदिर स्वच्छ केल्याचा प्रकार समोर आला होता. या तरुणांनी सत्तार यांच्या याच दर्शनावरून आक्षेप घेतला होता. अब्दुल सत्तार सकाळी जेवणात मांसाहार करतात, त्याशिवाय घर सोडत नाहीत. त्यामुळे अशा अपवित्र माणसाला महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात प्रवेश देण्याला विरोध करत या तरुणांनी मंदिरात गोमित्र शिंपडून मंदिर स्वच्छ केले. या प्रकारावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या सगळ्यावर अब्दुल सत्तार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आणखी वाचा

टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan on Rohit Pawar: रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले
रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Droupadi Murmu : ममता बॅनर्जींना मी माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण...; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांचीही टीका
ममता बॅनर्जींना मी माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण...; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांचीही कठोर शब्दात टीका
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget