एक्स्प्लोर

Aaditya Thackeray on Sanjay Shirsat : 50 खोक्यांमधील एक खोका आज दिसला; संजय शिरसाटांचा Video समोर येताच आदित्य ठाकरेंचा हल्ला

Aaditya Thackeray on Sanjay Shirsat : राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Aaditya Thackeray on Sanjay Shirsat : राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat Video) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत आहेत. तर बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळत आहे. संजय शिरसाट यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता यावरून ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 

आदित्य ठाकरे म्हणाले की,गेले दोन-अडीच वर्ष 33 देशांमध्ये गद्दारीची नोंद घेण्यात आली. 50 खोके एकदम ओके, त्याच्यातील कदाचित एक आज खोका दिसला असेल. हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत. परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना दिसला. आज एक खोक्यांसोबत बसले आहेत. ते आता बदलून सांगतील की, तिथे महात्मा गांधी छापलेले बनियन होते, बाकी काही त्यात नव्हते. पण, स्पष्टपणे दिसत आहे. ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्यावर आरोप झालेले आहेत, हॉटेल घेण्याचा प्रयत्न, जमीन बळकावण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे. पण, प्रश्न असा आहे की, या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंधे कारवाई करणार का? ते बिलकुल कारवाई करणार नाही. त्यांना आयटीची नोटीस आलेली आहे. ती खूप उशिरा आली आहे. पण, या आयटीच्या नोटीसीवर आता त्यांना क्लीन चीट मिळणार की खरोखर भाजप कारवाई करणार? हे बघावे लागेल, असा हल्लाबोल त्यांनी केला. 

आयटीची नोटीस आली तरी देखील ऐटीत फिरताय 

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, कालच त्यांना आयटीची नोटीस आली तरी देखील ते ऐटीत फिरत आहेत. काल कोणा-कोणाला नोटीस आल्या. कोण दिल्लीत गेले गुरुपौर्णिमा म्हणून? कोण भेटलं, कोण नाही भेटलं, याची यादी आपल्या सर्वांकडे आहे. पण, इतक्या निर्लज्जपणे हा कारभार चालला आहे. खरोखर मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करायची असेल तर हा व्हिडिओ पाहून ते काहीतरी पाऊल उचलतील, अशी आशा मी बाळगतो, असे त्यांनी यावेळी म्हटले. 

संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओवर संजय शिरसाट म्हणाले की, मी आत्ताच तो व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ काय दाखवतोय तर माझं घर आहे. तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे. माझं बेडरूम आहे. बेडरूममध्ये मी बसलेले बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे. व्हिडीओबद्दल मला आश्चर्य नाही, यात काही गैर नाही. टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावा त्यांनी केलाय.

आणखी वाचा 

VIDEO : पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट, संजय शिरसाट यांचा व्हिडीओ; संजय राऊतांचा दावा खरा ठरला?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Embed widget