नवी दिल्ली: मातीतून सोनं पिकवण्याची धमक माझ्या शेतकऱ्यांमध्ये आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात शेतीवर भाष्य केलं. 


देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. 

यावेळी शेतीबाबात मोदी म्हणाले, “मातीतून सोनं पिकवण्याची धमक माझ्या शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतीसाठी आम्ही 99 योजना आणल्या. त्यापैकी 21 योजना सुरु झाल्या आहेत. 50 योजना लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचल्याशिवाय त्याचं उत्पन्न दुपट्ट होणार नाही. शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यंदा शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं, त्यामुळे डाळीचं विक्रमी उत्पन्न झालं. सरकारने 16 लाख टन डाळ खरेदी करुन इतिहास रचला”

संबंधित बातम्या

‘ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’

LIVE एकीचं बळ ही देशाची ताकद : मोदी

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण