PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उपराजधानी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन (Dr. Hedgewar Smarak) परिसरात भेट देऊन येथील स्मृति मंदिराला नमन केलं आहे. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांना वंदन केलंय. देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होणारे मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहे. तर संघाचे शताब्दी वर्ष सुरु असताना पंतप्रधानाच्या या दौर्‍याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

Continues below advertisement


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाच्या स्मृती मंदिरासह दिक्षाभूमीला वंदन केल्यानंतर तेथील अभिप्राय वहीत आपला अभिप्राय देत विशेष संदेश दिला आहे. स्मृती भवन भरातीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनशक्तिला या त्रिसूत्री समर्पित असलेले स्थान असल्याचे गौरवाद्गार पंतप्रधानांनी काढले आहे. 


संघाच्या स्मृती मंदिराच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


परम आदरणीय डॉ. हेडगेवार जी आणि आदरणीय गुरुजींना विनम्र अभिवादन. त्यांच्या आठवणी जपत या स्मृती मंदिरात येऊन मी भारावून गेलो आहे. भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनात्मक शक्ती या मूल्यांना समर्पित असलेले हे स्थान आपल्याला राष्ट्रसेवेत पुढे जाण्याची प्रेरणा देते. संघाच्या या दोन भक्कम स्तंभांचे हे स्थान देशसेवेसाठी समर्पित असलेल्या लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जास्रोत आहे. आपल्या प्रयत्नांनी भारतमातेचा अभिमान सदैव वाढू दे! 


दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य मिळाल्याने मी भारावून गेलो- पंतप्रधान 


बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपुरातील दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य मिळाल्याने मी भारावून गेलो आहे. बाबासाहेबांची सामाजिक समरसता, समता आणि न्यायाची तत्त्वे या पवित्र स्थानाच्या वातावरणात सहज अनुभवता येतात.दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि गरजूंना समान हक्क आणि न्यायाची तरतूद करून पुढे जाण्याची ऊर्जा प्रदान करते.मला पूर्ण विश्वास आहे की या अमर कालात आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणी आणि मूल्यांचे पालन करू.देशाला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल. विकसित आणि सर्वसमावेशक भारताची निर्मिती हीच बाबासाहेबांना आपली खरी श्रद्धांजली असेल.


हे ही वाचा