एक्स्प्लोर

Parli Crime News : गाईंना गुंगीचे औषध देणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल; मंत्री पंकजा मुंडेंच्या आदेशानंतर हालचालींना वेग

Parli Crime News : परळी शहरात गाईंना गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्याचा प्रकरणात परळी शहर पोलीस (Beed Police) ठाण्यामध्ये दोन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आलाय.

Parli Crime News : बीडच्या परळी शहरात गाईंना गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु परिसरातील जागरूक नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आला. आता या प्रकरणात परळी शहर पोलीस (Beed Police) ठाण्यामध्ये दोन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आलाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता.

एबीपी माझाच्या बातमीनंतर या सर्व प्रकाराची माहिती मिळताच राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde)  यांनी पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांना या प्रकाराच्या पाठीमागे असलेल्या लोकांचा शोध घेण्याचे सांगितले होते. याबाबत परळी शहर पोलीस ठाण्यात दत्तात्रय दुनदुले यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता गाईंना गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न करणारे नेमके कोण? याचा शोध परळी शहर पोलीस घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय? 

बीड जिल्ह्याच्या परळी शहरातील स्नेह नगर भागात मध्यरात्रीनंतर गाईंना वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून गुंगीचे औषध खाऊ घालून त्यांना पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र हा संतापजनक प्रकार परिसरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर हे चोरटे पळून गेले. विशेष म्हणजे चोरट्यांचा झायलो आणि अर्टिगा गाडीतून गाई नेण्याचा प्रयत्न असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दरम्यान, चोरीच्या प्रयत्नांची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. कालांतराने ज्या गाईंनी हे पदार्थ खाल्ले होते त्या गाईंना हालचाल देखील करता येत नव्हती. यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, चोरटे गाडीतून उतरले आणि त्यांनी गाईंना ब्रेड, शेंगदाणे खाऊ घातले. त्यानंतर काहीच वेळात त्या गाई बेशुद्ध पडल्या. 

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार एबीपी माझा ने लावून धरला होता. अशातच 'माझा'च्या बातमीनंतर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेत बीड पोलीस प्रशासनाला कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याच्या सूचना पंकजा मुंडे यांनी दिल्या. त्यानंतर आता या प्रकरणी गाईंना गुंगीचे औषध देणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 April 2026: आज गुरूवारचा दिवस 8 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरू, स्वामींच्या कृपेने संकट टळणार, समस्या संपणार, आजचे राशीभविष्य
आज गुरूवारचा दिवस 8 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरू, स्वामींच्या कृपेने संकट टळणार, समस्या संपणार, आजचे राशीभविष्य
US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले
US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले
बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget